नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुद्रकावर गुन्हा दाखल

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- नारायण कांबळे

कोल्हापूर:- इचलकरंजी शहापूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 23/2026 नोंद
शहापूर (ता. शिरोळ) येथे सार्वत्रिक महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद महावीर सुभाष भिवरे (वय 52 रा. जयप्रकाश गृहनिर्माण संस्था, धरणगुती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे.
फिर्यादी नुसार, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.25 वाजण्याच्या सुमारास गल्ली नं 4 गणेशनगर, शहापूर येथील इचलकरंजी प्रभाग क्रमांक 03 झोन (ड) मध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे पँप्लेट वाटप करण्यात आले.
सदर पँप्लेट मुद्रक व प्रकाशक अंकुश गलगले (मुद्रक अथर्व प्रिंटर्स, रा. माहिती नाही) यांनी छापून प्रसिद्ध केल्याचे निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचार संहितेतील नियमांचे उल्लंघन करून निवडणूक प्रक्रियेवर गैरवाजवी परिणाम होण्याची शक्यता निर्माण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शहापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 171 व 223 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चळचुक करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!