नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील गुटखा माफिया अटकेत

निजामपुर पोलिसांची धडक कारवाई; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी हेमंत महाले/ अकिल शहा

धुळे :- निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक व विक्री करणाऱ्या गुटखा माफियावर निजामपुर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १ लाख ३२ हजार २८० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दि. १३ जानेवारी २०२६ रोजी निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. श्री. मयुर एस. भामरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, निजामपुर–जैताणे गाव परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखू साठवून विक्री केली जात आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार निजामपुर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान प्रशांत जगन्नाथ बदामे (रा. निजामपुर, ता. साक्री) हा आरोपी सावरकर रोड येथील स्वतःच्या दुकानात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूचा साठा करून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यास ताब्यात घेऊन घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमाल (थोडक्यात) :
विमल पान मसाला – विविध प्रकार (एकूण शेकडो नग)
V1 व VI तंबाखू
राजनिवास पान मसाला
जाफरानी जर्दा
👉 एकूण किंमत : १,३२,२८० रुपये
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या अटकेत आहे.
निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. मयुर एस. भामरे यांनी परिसरातील सर्व दुकानदार व नागरिकांना स्पष्ट इशारा देत आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित गुटखा, तंबाखूच्या साठवणूक अथवा विक्रीस कोणतीही मूक संमती देऊ नये. अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई मा. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, धुळे), मा. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक, धुळे) व मा. एस. आर. बांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री) यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:35 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!