आटपाडी आगारातून केवळ विद्यार्थ्यांसाठीच खास बसेस सोडाव्यात .
सादिक खाटीक यांची मागणी .
_________________
आटपाडी दि .१९ (प्रतिनिधी )
एस . टी . संपामुळे ग्रामीण भागातील मुला – मुलींचे शैक्षणीक भवितव्य अंधारात चालले असून परिक्षांचा कालावधी लक्षात घेऊन खास विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी शैक्षणीक बस सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे महासचिव सादिक खाटीक यांनी केली आहे .
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री . जयंतराव पाटील, एस .टी . महामंडळाचे सांगली जिल्हयाचे विभाग नियंत्रक आणि आटपाडीचे आगार प्रमुख यांना पाठविलेल्या खास ई – मेल द्वारे सादिक खाटीक यांनी ही मागणी केली आहे .
राज्यातील एस.टी . वाहक, चालक, कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती असली तरी शासनाने दिलेल्या सोयी सुविधांचा विचार करून, लोकांची गैरसोय टाळून एस . टी . कर्मचाऱ्यांना आंदोलन करता आले असते . मात्र सेवा ठप्प पाडून समाजाची अप्रत्यक्षरित्या सहानुभूती गमाविण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे . आटपाडी तालुका जिल्हयाच्या एका टोकाला असल्याने इथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक नुकसानींकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते आहे . आटपाडी आगाराचा विचार करता,आता कामावर असलेल्या १३६ एस . टी . कर्मचाऱ्या पैकी फक्त ८४ चालक – वाहक कामावर आहेत . पूर्वी ३७५ जण कामावर असत . १४० फेऱ्या पैकी ९८ फेऱ्याच सध्या सुरु आहेत . संपामुळे प्रतिदिनी एस.टी . चे २ लाखाचे वर नुकसान होते आहे. मुली – मुलांसाठीच्या अंदाजे २००० पासेस पैकी विद्यार्थी – विद्यार्थीनींकडे ३७५ पासेस आहेत . मुक्कामी जावून ग्रामीण भागातील विद्यार्थी – विद्यार्थीनीना शाळा कॉलेज साठी आटपाडी व महत्वाच्या गावाकडे घेऊन येणाऱ्या बसेस च्या फेऱ्या निम्म्याने बंद आहेत . याकडे सादिक खाटीक यांनी मान्यवरांचे लक्ष वेधले आहे .
एस .टी . चालक, वाहक, कर्मचारी यांच्या संपामुळे तालुक्याच्या सर्व व्यवहारांना मोठी खीळ बसली आहे . विद्यार्थी – विद्यार्थीनी वेळेत शाळेत पोहचू शकत नाहीत . दुचाकीस्वार, खाजगी वाहन चालकांना विनवण्या करून त्यांना प्रवास करावा लागतो . त्यामुळे विद्यार्थीनींचे जीवनही असुरक्षित बनले आहे . आटपाडी आगाराची ही दुरावस्था लक्षात घेऊन एस.टी . च्या विभाग नियंत्रकांनी आटपाडीसाठी विशेष धोरण राबविण्याची आवश्यकता असल्याचे सादिक खाटीक यांनी या इ – मेल मध्ये स्पष्ट केले आहे .
संपावरील कर्मचाऱ्यांचे मन वळविणेत यावे . निलंबीत असणाऱ्या पण सेवेत येऊ इच्छिणाऱ्यांना विनाविलंब कामावर घ्यावे . आटपाडी तालुक्यातील अवजड वाहतूक परवाना असणाऱ्या वाहन चालकांना कंत्राटी पद्धतीने भरती करावे . किंवा शेजारच्या तालुक्यातील काही कर्मचारी आणून आटपाडीची सेवा पुर्ववत करावी . आटपाडी तालुक्याचा विस्तार मोठा असून ६० गावे शेकडो वाड्या वस्त्या मधून विखुरलेल्या जनतेला एस.टी . हेच सोयीचे, महत्वाचे आणि परवडणारे साधन आहे . विद्यार्थी – विद्यार्थीनी, अंध – अपंग, ज्येष्ट नागरीक वगैरेंसाठी एस.टी . ची सुविधा जणू संजीवनीच आहे . तथापी जिल्ह्याच्या ठिकाणापासून खुप लांब आटपाडी शहर आहे. आटपाडी तालुक्याच्या सर्व गावातून शैक्षणीक सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना एस.टी ने आटपाडी सह मोठ्या गावातील शाळा महाविद्यालयांना जावे लागते . पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दहावी – बारावीच्या परिक्षा सुरु होणार आहेत . या बहुतांश मुला – मुलींचे पालक कष्टकरी असल्याने ते स्वतंत्र वाहनाने त्यांना परिक्षा स्थानी पोहचवू शकत नाहीत . अनोळखी व्यक्तींना प्रवासासाठी विनंती करून खाजगी दुचाकी – चार चाकी वाहनातून एकट्या दुकट्याने प्रवास करणे मुलींच्या बाबतीत एखाद वेळेस धोक्याचेही ठरू शकते. तसेच अशी विनंती करून मुले वेळेवर परिक्षेला पोहचू शकत नाहीत . त्यामुळे शालेय, विद्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यां बाबतीत विचार करून विशेष बस सेवा सुरु करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तातडीने नियोजन केले जावे . पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यासाठी ची गैरसोय तातडीने दुर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचित करावे, असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .