माठातील पाणी संपते मात्र दारू संपत नाही. युवापिढी व्यसनाच्या विळख्यात
नंदुरबार – रविंद्र गवळे
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पी.आर पाटील यांच्या कडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाचा कळस गाठला जातोय.तर दुसरी कडे गुन्हेगारी क्षेत्रात गुन्हेगारांवर वचक बसवून पोलीस प्रशासनाची मान उचावली आहे.यातच अनेक प्रकारचा देशी विदेशी बनावट दारूची अवैध वाहतूक रोखण्यास त्यांना यश मिळाले आहे.मात्र सारंगखेडा ( ता.शहादा ) हद्दीतील 41 खेडे गावांमध्ये हातभट्टी दारूने अनेक तरूणांचा संसार उद्ध्वस्त झाले आहेत.या दारू मुळे सुशिक्षित तरूण व्यसनाधीन होत चालले आहेत. माठातील पाणी संपते पण परीसरात हातभट्टीची दारू संपत नाही असे चित्र पहायला मिळत आहे.अनेक ग्रामपंचायतीच्या ठराव सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिला असून मात्र आज पर्यंत कारवाईचा फक्त देखावा केला गेला आहे.अनेकांनी पोलिसांकडुन ठोस कारवाई होत नसल्याने पोलीसांचा हात ओले असल्याचे बोलून पोलीसांचा कामकाजावर तसेच कार्यक्षमतेवर प्रश्न हि उपस्थित केले आहेत.देशी विदेशी दारूचा दर अधिक असल्याने मद्यपीं हातभट्टीकडे वळून जात असल्याचे दिसून येत आहे.तर दुसरीकडे सारंगखेडा पोलीस ठाण्यातील 41 खेड्यांगावांमध्ये हातभट्टीचा दारू काढण्याचे प्रमाण वाढले. देशी व विदेशी दारूच्या किमती वाढविल्याने मद्यपींनी हातभट्टीकडे मोर्चा वळविला. परंतु दारु काढणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे.आणि यावर पोलीसांनी बघ्याची भुमीका स्वीकारलेली असल्याचे बोलले जात आहे.परिसरातील बऱ्याच दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात.पोलीस दारू विक्री करण्याऱ्याला फकडून घेवून हि जात असता मात्र तो आरोपी एका तासत परत गावात फिरताना दिसतो.मग पोलीसांनी कारवाई केली कोणती असा प्रश्न उपस्थित होतो.या परीसरात रोजंदारी करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.अंगमेहनतीची कामे करीत असल्याने बहुतेकांना दारूचे व्यसन जडले आहे.गावठी दारू सहज मिळू लागल्याने युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली.यामध्ये बेरोजगार युवकांची संख्या अधिक असल्याचे वास्तव पुढे आले आहे. हातभट्टीची दारू काढण्यासाठी प्रामुख्याने मोह फुलाची आवश्यकता असते.परंतु हातभट्टी दारूची मागणी लक्षात घेऊन जंगलातील सळलेला पाला पोचाळा, विशिष्ट झाडांच्या साली तसेच विविध प्रकारच्या रासायनांचा वापर केला जात आहे.परंतु मद्यपी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून केवळ नशेसाठी हातभट्टीची दारू पित असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली आहे.गावठी दारूमुळे परिसरातील शेकडो मद्यपींना वेगवेगळे आजार जडले.कुटुंबांमध्ये भांडणे वाढली. मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च होणारा पैसा वाममार्गाला जाऊ लागला.परिणामी, शेकडो कुटुंबातील महिला हैराण झाल्या आहेत. ही दारू केवळ १० ते २० रूपये ग्लास मिळत असल्याने पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.यातून शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत.पोलिसांकडून कारवाई होते मात्र तो फक्त देखावा असतो अस परीसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.अनेक ठिकाणी दारू बंदी असल्याचे फक्त कागदावर आहे.दारू बंदी असूनही दारू का बंद झाली नाही.असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.दारु विक्रीच्या प्रश्नावर पोलिसांकडून दुलक्ष होत असल्याने हातभट्टीची दारु पिऊन शेकडो नागरिकांचे आरोग्य बिघडले. काही व्यक्तींचा मृत्यू झाले असल्याचे बोलले जात आहे.तरी मात्र शासनाने व्यसन मुक्ती शिबिर राबविले नाही. यामुळे कागदावरील दारूबंदीविषयी महिला संताप व्यक्त करीत आहेत.व पोलीसांचा कार्यक्षमतेवर तसेच कामकाजावर प्रश्न उपस्थितीत केला असून नाराजीचा सुर उमटून आला आहे.याची दखल वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेच घ्यावी व सारंगखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेली अवैध हातभट्टी दारू कायम स्वरूपी बंद करावी अशी मागणी परीसरातील महिला व सुज्ञनागरिकांडून व्यक्त केली जात आहे.