नंदुरबार – रविंद्र गवळे
नंदुरबार जिल्हाभरात पाणी व दुध पिणाऱ्या नंदीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात झाली. गणपती दूध पितो, नंदी पाणी पितो अशा घटना अधूनमधून कुठे ना कुठे घडतच असतात. एकाच दिवशी राज्यभर महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी पित असल्याची चर्चा सोशल मीडिया माध्यमातून पसरली आणि मग काय सर्वत्र मंदिरात गर्दी झाली.नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेडे गावात हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी तसा प्रयत्न केला असून नंदी पाणी व दुध पीत असल्याची जोरदार चर्चा सुरूच झाली. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे एक विज्ञान असून अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सागितले आहे.श्रद्धेच्या जगात भक्तिभावसोबतच अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणात आहेत.दरवर्षी कुठे ना कुठे काही ना काही चर्चा होतच असते. कधी गणपती दूध पितो तर कधी नंदी पाणी पितो, कुठे दगड गोल फिरतो तर कुठे मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू, कुंकू बाहेर पडते असे प्रकार समोर येत असतात. प्रत्येकवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकारांचे खंडन केले जाते.आणि त्याला विज्ञानाची जोड देण्यात येत असते.नुकतेच महाशिवरात्री पार पडली असून शनिवारी असाच एक प्रकार समोर आला. महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती दुध व पाणी पीत असल्याची माहिती गावभर पसरली.नातेवाईकांनी राज्यभरात एकमेकांना फोन करून माहिती दिली. आणि आपल्या परिसरातील मंदिरात हा प्रयोग करून पाहण्याचे सांगितले. नंदुरबार जिल्हासह शहादा तालुक्यातील वडाळी, बामखेडा, वडशील,असे अनेक गावातील एका मंदिरात हा प्रकार सकाळी १० वाजता सुरु झाला.नंदीच्या मूर्तीला काही भाविकांनी चमच्याच्या साहाय्याने पाणी पाजून पाहिले. एक-एक करता सर्वांच्याच हाताने नंदी पाणी व दुध पिऊ लागला.बघता बघता भाविकांच्या मदिरावर रांगा लागल्या. घरून ग्लास, तांबे घेऊन लोक मंदिरात येऊ लागले.भगवान महादेवांच्या नावाचा जयघोष करीत नंदीला पाणी व दुध पाजू लागले.नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. काहींनी हा प्रकार अंधश्रद्धा समजला तर काहींनी श्रद्धा समजून इतरांना देखील कळविले.
यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक विडिओ किल्प सोशल मीडियावर व्हायरल झालेली.त्यात नंदी किंवा गणपती कधीच पाणी, दूध पित नसतो. वैज्ञानिकदृष्ट्या पाण्याच्या पृष्टीय ताणाच्या अप्रभावामुळे हा प्रकार घडत असतो. पाणी आणि मूर्ती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याने त्या काहीश्या आकर्षित होऊ शकतात. एखादा साधा दगड देखील १ किंवा २ थेंब पाणी आतमध्ये घेऊ शकतो. सोशल मीडियाचा गैरवापर करीत ही अफवा पसरवली जात असून नागरिकांच्या श्रद्धेचा उपयोग केला जात आहे.असे त्या विडिओ किल्प मध्ये सिद्ध करण्यात आले.
मात्र घडलेल्या प्रकारांमुळे महिला वर्गाची एकच झुबड उडालेली पहावयास मिळाली.