कर्जत: प्रतिनिधीकर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिसेगाव येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करुन फसवणूक केल्याप्रकरणी एका नराधमांवर कर्जत पोलिस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु घटनेला आठवडा होऊन देखील आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे कर्जत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 01/05/2020 रोजी 11:00 वा ते दि. 26/10/2021 रोजी 11:00 वा च्या दरम्यान 03 आरोपीत सर्व रा.प्रथमेश हाउस गुरु नगर मुद्रे ता. कर्जत यांनी आपआपसात संगणमत करुन आरोपी क्र.01 प्रथमेश जयवंत सुपे याने महिला फिर्यादी रा. भिसेगाव, ता. कर्जत यांना कोणत्याही रितीरिवाजाप्रमाणे लग्न न करुन फक्त लग्न केल्याचे भासवुन जे लग्न केले आहे ते कायदेशीर आहे असे भासवुन लग्नाचे आमिष दाखवुन फिर्यादी यांच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध ठेवुन जबरदस्ती गर्भपात करण्यास भाग पाडुन फिर्यादी यांना खोटया लग्नानंतर आरोपीने याने त्याचे घरी नांदवायला घेवुन जातो असे सांगुन नंतर याने सोबत रहावयाचे नाही घटस्फोट घे मला सोबत राहावयाचे नाही असे बोलुन फिर्यादी यांना हाताबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिली तसेच गैरफायदा घेवुन फिर्यादी यांचे शारीरीक व मानसिक शोषण केले तसेच आरोपीत क्रं.02 जयवंत सुपे याने फिर्यादी सोबत यांचेशी लग्न करुन देतो असे दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही, तसेच आरोपीत क्रं.03 आरोपीची आई यांनी फिर्यादी यांना तु जावुन जिव दे व फिर्यादी यांची बाहेर खुप लफडी आहेत अशी सर्वत्र बदनामी केली. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.49/2022 भा.दं.वि.क.376,420,323,313, 504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मसपोनि / श्रीमती अथने करीत आहेत.