जामनेर/प्रतिनीधी-
यशवंत हो जयवंत हो!
राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी संचलित,
स.म.कै.विष्णूअण्णा पाटील माध्यमिक विद्यालय सावळी
येथे आज रोजी “राष्ट्रीय महिला दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी यावेळी विद्यालयात कौशल्या मोरे, मालन पवार, रंजना शिंदे(ग्रामपंचायत सदस्य) तसेच भांबुरे मॅडम ,मुल्ला मॅडम(मराठी शाळा सावळी) सुजाता माळी उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका , व आरोग्य सेविका लांडगे ताई, उज्वला मोरे ताई, शिल्पा माने, (आशा वर्कर) तसेच वंदना मोहिते, अश्विनी कांबळे (बचत गट अध्यक्ष व सदस्य)अश्या विविध क्षेत्रातील महिलांचा फूल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिलांच्या आवडीचा खेळ, म्हणजे पैठणीचा खेळ घेण्यात आले. विविध फनी गेम्स घेण्यात आले .तसेच उखाणे स्पर्धा घेण्यात आले.महिलांनी अत्यंत उत्साहात सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.प्रथम विजेत्या स्पर्धकास पैठणी देण्यात आली. तसेच द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना ‘नथीचा मान’ भेट देण्यात आली. संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकास पैठणी देण्यात आली. सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. तसेच “आदर्श माता पुरस्कार,” ‘पाद्यपूजा’ करण्यात आली सर्व स्पर्धा ची बक्षिसे कौशल्या मोरे (ग्रामपंचायत सदस्य) वंदना मोहिते( बचतगट अध्यक्ष) ग्रामपंचायत सदस्य व मराठी शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते घेण्यात आली. वार्षिक क्रीडा स्पर्धेतील शाळेतील विजेते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. पाद्य पूजा करण्यात आली व “आदर्श माता”पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, तसेच पालक महिला मोठया संख्येने उपस्थित होते.