नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुकाणे गावात “विचार जागरतेन” साजरी झाली “महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची” १३१ वी जयंती.

प्रतिनिधी गौतम जगताप:- कुकाणे,ता.मालेगाव येथे
१४ एप्रिल २०२२ रोजी विश्वरत्न, भारतरत्न, महामानव बौद्धीसत्व डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती कुकाणे गावात साजरी झाली “विचार जागरतेने”
महामानवाचे विचार प्रत्येकात रूजले पाहिजेत ह्या हेतूने जि.प.मराठी शाळेतल्या शिक्षकांनी व समाज बांधव आणि सरपंच सदस्य यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणांचे कार्यक्रम घेण्यात आले.
बालमनावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मस्तकी रूजावेत. प्रा.डाॅ.राजश्री अहिरे, गौतम जगताप, अशोक जगताप, बाबासाहेब जगताप,मराठी शाळेचे शिक्षक कुवर सर यांनी प्रास्ताविक केले. ब्राम्हणकर मॅडम,अहिरे मॅडम जगताप सर, मुख्याध्यापक काळे सर, त्यांच्या आठवणींना उजाळा देत जि.प.मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत भाषणे केली व विद्यार्थ्यांना वही पेन बक्षिस स्वरूपात देण्यात आले. तसेच
शिवव्याख्याते कवी लेखक श्री. समाधान दादा हेंगडे पाटील नाशिक (मखमलाबाद) यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कुकाणे येथे व्याख्यान आयोजित केले होते. संध्याकाळी ठिक 7:00 वा कुकाणे गावाच्या सरपंच प्रा.डॉ.राजश्री कैलास अहिरे , प्रा.कैलास साधु अहिरे यांनी महामानवांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून दिपप्रज्वलनाने अभिवादन केले व पुढील कार्यक्रमास सुरुवात केली.
शिवव्याख्याते श्री.समाधान दादा हेंगडे पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य भगवान केदारे यांनी केला. व सरपंच प्रा.डाॅ.राजश्री अहिरे यांचा सत्कार नंदाबाई केदारे यांनी केला.
शिवव्याख्याते समाधान दादा हेंगडे पाटील यांनी शिव छत्रपती, शाहु, फुले, आंबेडकर, राजमाता जिजाऊ, त्यागमुर्ती रमाई, अहिल्याबाई होळकर,संत कबीर,संत तुकाराम,संत नामदेव, महापुरुषांचे विचार व गाथा महामानवाची जीवनगाथा आपल्या कणखर आवाजात व बाणेदार शैलीत व्यक्त होताना अतिशय व्यापक दृष्टीने चिंतनात्मक, महामानवाची विचार सरणी मांडली.
तसेचं सामज बांधव, काकाजी केदारे, केदारनाथ जगताप, ईश्वर केदारे, भगवान केदारे,दादाजी जगताप,राजेंद्र मगरे, भावराव पगारे,बाजीराव पगारे,रामभाऊ पगारे, गोविंद पगारे,रतन अहिरे,लक्ष्मण पगारे,नाना ढिवरे,नानाजी पगारे, ग्रामस्थ कैलास अहिरे,भगवान शिंदे,ग्यानदेव डापसे,नाना पवार, अशोक डापसे, रावसाहेब सोनवणे, संतोष शेवाळे, अशोक अहिरे,पो.पाटील एकनाथ अहिरे सर्व ग्रामस्थ व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!