नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रिंगणगाव युनियन बँकेच्या व्यवस्थापका विरुद्ध ३०६ चा गुन्हा दाखल करा.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची व भावाची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार…

प्रतिनिधी :- उमेश महाजन

एरंडोल:-संजय अर्जुन पाटील हे रिंगणगाव येथे राहत होते ‌. ते अर्धांगवायु ने पीडित होते त्यांनी शेतीसाठी रिंगणगाव येथील युनियन बँकेकडून आठ लाखाचे कर्ज घेतले होते त्यापैकी त्यांनी बऱ्याचशा रकमेची परतफेड केली होती. मी अर्धांगवायूचा पीडित असल्यामुळे मला कर्ज माफ करून द्यावे अशी मागणी मृत शेतकरी संजय पाटील यांनी बँक मॅनेजर कडे केली असता. तुम्हाला सदर कर्जाची रक्कम माफ करून घेण्यासाठी मरावे लागेल असे बँक मॅनेजर राहुल बिराद्रे यांनी धमकावल्याचा आरोप कविता संजय पाटील व प्रशांत अर्जुन पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारी द्वारे केला आहे.
कर्ज माफी चे प्रकरण लोकन्यायालयात ठेवले नाही. त्यामुळे संजय पाटील हे व्यथित झाले. या त्रासामुळे संजय अर्जुन पाटील यांनी २८ मे २०२२ रोजी विहीरीत उडी मारुन बँक मॅनेजर च्या त्रासामुळे व धमकावून यामुळेच यांनी आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला आहे युनियन बँकेचे मॅनेजर बिराद्रे यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारी अर्ज द्वारे करण्यात आली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!