धुळे प्रतिनिधी: धुळे – आज दिनांक 14 जून रोजी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत, धुळे मनसे पदाधिकारी यांच्या वतीने जनतेस उद्देशून असलेल्या राज ठाकरे यांच्या पत्रकाचे धुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये , वार्डात, शहरातील विविध भागात तसेच विशेषता आग्रा रोड वरील व्यापारी वर्गांना वाटप करण्यात आले.
या पत्रक वाटपाचा शुभारंभ आग्रा रोड येथिल श्रीराम मंदिरापासून मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप जडे, महानगराध्यक्ष संजय सोनवणे , धुळे तालुका अध्यक्ष संतोष मिस्तरी, महिला सेना जिल्हाध्यक्ष संध्या पाटील , शहराध्यक्ष अमिषा गावडे, रुचिता पाटील , राजेश दुसाने,निलेश गुरव, अविनाश देवरे, दीपक बच्छाव, बापू ठाकूर ,सतीश पाटील , योगेश वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आग्रा रोड वरील दुतर्फा व्यापारी पेठ आहेत येथे या पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी जनतेतून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचे पत्र हातात मिळाल्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देवून, आनंद व्यक्त करण्यात आला.
मशिदी वरील भोंग यांच्या संदर्भात सन्मानीय राज साहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका व हा विषय अजून पूर्णत्वास गेलेला नाही त्यामुळे आगामी काळात काय करायचे ? या संदर्भात जनतेला उद्देशून सदर पत्र सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिले होते. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आपापल्या गावात, प्रभागात, वार्डात याचे वाटप करून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सदर पत्रक वाटपाच्या कार्यक्रमास पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली. यावेळी जनतेकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.