प्रतिनिधी :- सचिन कोळी
गडहिंग्लज : गडहिंग्लज पोलीस स्टेशनकडील पोलीस शिपायाने तणनाशक पिवून आत्महत्या केली आहे. आकाश लक्ष्मण हजारे (वय ३२, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) असे त्याचे नाव असून सध्या तो गडहिंग्लज पोलीस चाळीतील खोलीत राहत होता. घरगुती कारणावरून त्याने आज तणनाशक पिऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितनुसार, गडहिंग्लज पोलिस चाळीत राहणारे पोलिस शिपाई आकाश हजारे यांनी घरगुती कारणावरून काल तणनाशक पिले. त्यानंतर तात्काळ त्याला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने तात्काळ त्याला कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होते. मात्र, तेथे औषध उपचार चालू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे आई व पत्नी असा परिवार आहे. दिवंगत लक्ष्मण हजारे यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर आकाश यास सरकारी नोकरी मिळाली होती. तो गडहिंग्लज पोलीस स्टेशनला चार महिन्यापूर्वी हजर झाला होता. आकाश हजारे या पोलीस शिपाईच्या दुःखद निधनाने सिद्धनेरलीसह गडहिंग्लज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धनेर्ली गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.