प्रतिनिधी हिंगोली : हिंगाेली येथील सेनगाव तालुक्यातील सवना जिल्हा परिषद शाळेतील तीन मुख्यध्यापकांना प्रशासनाने निलंबित केले आहे. शालेय पोषण आहार योजना राबवताना अनियमितता केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
किशोर मरळे, एमडी घ्यार व एस. टी. गोरे असे निलंबित केलेल्या मुख्याध्यापकांची नावे आहेत. तसेच मुख्याध्यापक बालाजी सोनटक्के यांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. ही कारवाई हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देणे यांनी सवना गावातील सुरेश वानखडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर चाैकशी करुन केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शालेय पोषण आहार योजना राबवताना अनियमितता केल्याचा ठपका या मुख्याध्यापकांवर ठेवण्यात आला हाेता.