प्रतिनिधी – बाबा शेख
DPT NEWS : पुणे जिल्ह्यातील चाकण येथील महिलेच्या खून प्रकरणी परळी तालुक्यातील कण्हेरवाडी येथील युवकाला पुणे पोलिस आणि DB पथकाचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी की, चाकण येथील गौरख देशमुख याने आपली पत्नी आशा देशमुख यांच्या खुनाची सुपारी पुणे येथील देवा मानवर, रॉकी, सचिन मुंडे या तीन युवकांना दिली होती, खुनाची सुपारी दिल्यानंतर ठरल्याप्रमाने मयतच्या पतीने चाकण परिसरातील जंगलात खड्डा करत महिलेला पुरण्याची पूर्ण तयारी केली आणि 3 आरोपीच्या मदतीने गौरखं देशमुख याने आशाचा खून करत तिला खड्यात गाडले मात्र जंगलात गाय चारण्यास येणाऱ्या गुराख्यास या प्रकरणाची कुणकुण लागेल या भीतीने आरोपींनी परत एकदा मयताचे प्रेत बाहेर काढत जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पावसामुळे प्रेत अर्धवट जळाल्याने आरोपींनी महिलेच्या पोटाला दगड बांधत चाकण परिसरातील एका तळ्यात टाकले मात्र काही दिवसांनी महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाला वाचा फुटल्याने चाकण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
गौरख देखमुख याने दिली होती पत्नी हरवल्याची तक्रार
मयत आशा देशमुख यांचे पती गौरख देशमुख यांनी 5 सप्टेंबर रोजी चाकण पोलीस स्टेशन मध्ये आपली पत्नी हरवली असल्याचे तक्रार दिली होती मात्र पोलीस तपासात गौरख देशमुख यानेंच आपल्या पत्नीच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
*भास्कर केंद्रे, गोविंद भताने यांच्या धाडसी कारवाईचे होत आहे सर्वत्र कौतुक*
कुठलाही ठोस पुरावा नसताना केवळ आडनावाचा आधारावर नियोजनबद्ध सापळा रचून आरोपी सचिन मुंडेचा मुसक्या आवळत अटक केल्याने डीबी पोलीस भास्कर केंद्रे, गोविंद भताने यांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.