DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री शहरातील काही ठिकाणी साक्री नगर पंचायतीच्या अध्यक्ष जयश्रीताई पवार यांच्या हातून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी
अंबापुर रोडावरची भिलाटी साक्री. शेवाळी. कावठे. अक्कलपाडा .म्हसदी. भांडणे.दातर्ती. या गावात साधारणता १०० ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.यावेळी डॉ. मासुळे. देसले नाना. मंगू तात्या. प्रमोद ओतारी. अमित भैया. दीपक मोरे. संजू शेट्टी. दुर्गेश सोनवणे. सचिन सोनवणे. किरण मोरे. रघुनाथ आप्पा. असे काही सत्संगी बांधव उपस्थित होते विश्व रूहानी मानव केंद अध्यात्मिक संस्था आहे. ही संस्था संत बलजीत सिंह जी द्वारा शिकवलेल्या नैतिक जीवन आध्यात्मिक आणि ध्यानसाधनेवर आधारित कार्यक्रमांचे आणि जनकल्याण साठी विविध प्रकारचे समाजसेवि कार्यक्रमांचे आयोजन करत असते.
covid-१९ महामारी च्या दौरान पूर्ण ऊर्जा आणि जोशाने या संस्थेद्वारा सामाजिक कार्य करण्यात आले.
विश्व मानव रूहानी केंद्राचे सामाजिक कार्यकर्त्यांनी पूर्ण सन्मान व उत्साहामध्ये सेवा केली. जाते विश्व रुहानी मानव केंद्र यांच्या सदस्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या समाजसेवेचे आयोजन या संस्थेद्वारा मागच्या खूप वर्षापासून केले जात आहे.
आणि पुढे सुद्धा विश्व रुहानी मानव केंद्र अशाच प्रकारे जनकल्याण कार्यासाठी प्रशासनाला सहयोग करत राहील.