DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांची नुकतीच धुळे शहर पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी शिरपुर येथून साक्री पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यदक्ष श्री.रविंद्र देशमुख यांची नुकतीच नियुक्ति करण्यात आली आहे. साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साहेब यांची भेट घेवून शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, या वेळी तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, कार्याध्यक्ष अरुण अहिरराव, उपाध्यक्ष अकिल शहा, सचिव खंडेराव पवार, खजिनदार कल्पेश मिस्तरी, शहराध्यक्ष जगदीश जगदाळे, शहर उपाध्यक्ष संघपाल मोरे, ज्ञानेश्वर ढालवाले, सचिन सोनवणे, दिपक मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.