DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी : मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगर : (दि-२१डिसेंबर) श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथील एमआयडीसी मध्ये स्थानिक मुलांना व तसेच जत्या ठिकाणी असणारे ठेकेदारी किंवा कामे स्थानिकांनाच मिळावी त्याचप्रमाणे कंपनीचा असणारा CSRफंड हा आपल्याच गावासाठी मिळाला पाहिजे या विषयावर सरपंच सौ शुभांगी ताई बाळु भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी विशेष ग्रामसभेला तहसीलदार वैशाली ताई वाघमारे मॅडम या प्रमुख उपस्थित होत्या. उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की एमआयडीसी मध्ये आमची मुले काम किंवा ठेकेदारी मागण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना विचारात घेतले जात नाही व त्या ठिकाणी आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. तरी आपण या विषयावर लक्ष देण्यात यावे असे सांगितले. यावेळी तहसीलदार त्यांनी सांगितले की मी तुमच्या सर्व ग्रामस्थांशी सहमत असून खेड पोलीस स्टेशनचे पी आय चव्हाण साहेब यांच्या बरोबर बोलुन आपल्याला योग्य तो न्याय देण्यात येईल तसेच सर्व कंपनीच्या व्यवस्थाकांची एकत्र मीटिंग घेऊन व कलेक्टर साहेबांशी मी स्वतः बोलुन आपल्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.असे सांगितले सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार मॕडमचे यावेळी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.विशेष ग्रामसभेतील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले असल्याचे माजी सरपंच अमरभाऊ शिंदे यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप भगत, ग्रामपंचायत सदस्य रूपाली काळे, शामल शिंदे, तलाठी आचारी भाऊसाहेब, ग्रामसेवक रमेश खैरे, हर्षवर्धन शिंदे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विनायक राऊत, माजी सरपंच कैलास थोरात, पवन सुर्वे, अमर शिंदे, व मनोहर गोरगल्ले यांनी आपले विचार व्यक्त केले. या विशेष ग्रामसभेसाठी पोपटराव तांबे तंटामुक्ती अध्यक्ष, राहुल सोनवणे अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश, सदानंद तांबे, प्रवीण हुलगे, यांनी प्रयत्न केले सभेसाठी अंदाजे २००च्यावर ग्रामस्थ व महिला भगिनीं तसेच तरुण युवक उपस्थित होते.