DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: अकील शहा
साक्री : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने शैलेंद्र आजगे यांची पंचायतराज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील नियुक्तीपत्र प्रदेश संयोजक गणेश काका जगताप यांच्या वतीने त्यांना नुकतेच देण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी पक्षाकरिता शैलेंद्र आजगे यांनी विविध जबाबदाऱ्या घेऊन पक्ष संघटन वाढीसाठी अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना पक्षाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची ही निवड केली गेली आहे. शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजगे हे अथक परिश्रम करतील असा विश्वास पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक गणेश काका जगताप यांच्या कडून व्यक्त करण्यात आला आहे.
पंचायतराज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी शैलेंद्र भगवान आजगे यांची स्तुत्य निवड झाल्याबद्दल माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ सुभाष भामरे, भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस दरबार सिंग गिरासे, यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.