DPT NEWS NETWORK ✍️📝
धुळे- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससह) व इतर आजाराचे शिबीर आयोजित केले आहे. त्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. सदर शिबीरास नागरिकांकडून उत्स्फुर्त पाठींबा मिळत आहे. सदर शिबीरास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मा. नगरसेवक दिलीप आप्पा देवरे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
सदर शिबीरात एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे संचलित कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय धुळे याचे तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया लेन्ससह मोफत करण्यात येणार आहे. शिबीरात डॉ. सुशिल महाजन (मेंदू व मणके विकार तज्ञ), डॉ. तुषार देवरे ( मोतीबिंदू
शिबीर तज्ञ), डॉ. रविंद्र पाटकरी (हृदयरोग व मधुमेह तज्ञ), डॉ. तुषार कानडे (बालरोग
तज्ञ), डॉ. उज्वला घुमरे (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ), डॉ.विशाल पाटील (मेडिसीन) डॉ. पल्लवी बागुल (त्वचारोग तज्ञ), डॉ. स्वप्नील देवरे (दंतरोग), डॉ. एकनाथ माळी (पॅथालॉजी), डॉ. मनोज परदेशी (फिजिशियन अॅण्ड जनरल), डॉ. योगेश पाटील (फिजिशियन अॅण्ड जनरल), डॉ. दिपक फुलपगारे (फिजिशियन अॅण्ड जनरल), वरील सर्व डॉक्टर शिबीरात रुग्णांची तपासणी करणार आहेत.
तरी गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मा. नगरसेवक
दिलीप आप्पा देवरे यांनी केले आहे.
शिबीराची तारीख शनिवार दि. 21 जानेवारी2023रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत ठिकाण- विश्वकर्मा भवन, कुंभार खुंट, जुने धुळे, धुळे टिप- शिबीरात येणाऱ्या रुग्णांसाठी नाश्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.