DPT NEWS NETWORK ✍️
धुळे- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससह) व इतर आजाराचे शिबीर आयोजित केले होतेसदर शिबीरास नागरिकांकडून उत्स्फुर्त पाठींबा मिळाला. सदर शिबीरास 408 रुग्णांनी तपासणी करुन घेतली व समाधान व्यक्त केले.
सदर शिबीराचे आयोजन मा.नगरसेवक दिलीप आप्पा देवरे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष हनुमंत दामु वाडीले होते, सदर शिबीराचे उद्घाटन डॉ. रविंद्र पाटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबीरास विलासराव माळी, अण्णा गजमल माळी, विठोबा माळी, धिरज पाटील, संदीप सूर्यवंशी, बी. एन. बिरारी, एस.टी. चौधरी सर, अनिल बोरसे, कैलास पाटील, बी.बी. महाजन सर, कैलास मराठे, विनोद जगताप, ज्ञानेश्वर फुलपगारे, विष्णू जावडेकर, विक्रम फुलपगारे, संजय माळी, चैत्राम भदाणे सर, मुरलीधर रोकडे, रुग्णमित्र दिलीप माळी, भरत माळी, सुनील माळी,
लोकेश माळी, ज्ञानेश्वर माळी, शिरीश देवरे आदी उपस्थित होते. सदर शिबीरात एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे संचलित कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय धुळे याचे तर्फे घेण्यात आले होते.
शिबीरात डॉ.सुशिल महाजन (मेंदू व मणके विकार तज्ञ), डॉ. तुषार देवरे ( मोतीबिंदू शिबीर तज्ञ), डॉ. रविंद्र पाटकरी (हृदयरोग व मधुमेह तज्ञ), डॉ. तुषार कानडे (बालरोग तज्ञ), डॉ.उज्वला घुमरे (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ), डॉ.विशाल पाटील (मेडिसीन) डॉ. पल्लवी बागुल (त्वचारोग तज्ञ), डॉ. स्वप्नील देवरे (दंतरोग), डॉ. एकनाथ माळी (पॅथालॉजी), डॉ. मनोज परदेशी (फिजिशियन अॅण्ड जनरल), डॉ. योगेश पाटील (फिजिशियन अॅण्ड जनरल), डॉ. दिपक फुलपगारे (फिजिशियन अॅण्ड जनरल), वरील सर्व डॉक्टर शिबीरात रुग्णांची तपासणी केली.
असंख्य गरजुंनी या शिबीराचा लाभ घेतला.