DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदिप सकट
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामसेवक यांच्या कडुन प्रत्येकी पंचवीस हजार प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे. या दंडाची रक्कम ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीतील सामान्य पावती करून ग्रामपंचायतीच्या खात्यावर भरलेली आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतचे लेखा परीक्षा झालेली नाही व लेखा परिक्षण साठी दप्तर उपलब्ध करून दिले नाही अश्या ग्रामपंचायतीची माहिती जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद कार्यालयाने तात्काळ ज्या ग्राम पंचायतीचे लेखा परीक्षा झाले नाही अश्या ग्राम पंचायतीचे अहवाल पंचायत समितीकडून मागविण्यात आले व ज्या ग्रामपंचायतींनी अद्याप दप्तर दिले नाही अशा ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक यांच्यावर महाराष्ट्र स्थानिक लेखा परिक्षा (सुधारणा) अधिनियम 2011 कलम 8 प्रमाणे दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात यावा असे कळविले. त्यातील हातकणंगले पंचायत समितीने रूकडी ग्रामसेवक सतिश फक्कड लोंढे, गगनबावडा पंचायत समितीने किरवे ग्रामसेवक शंकर लक्षमण कोळी, शाहूवाडी पंचायत समितीने माळेवाडीचे ग्रामसेवक प्रशांत आनंदा पोतदार, राधानगरी पंचायत समितीने धामनवाडी ग्रामसेवक तसेच गडहिंग्लजचे ग्रामसेवक यांच्याकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी कामगार सेना पैलवान विकास पुजारी यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1021 ग्रामपंचायत असून यातील सण 2009 ते 2010 अखेर पर्यंत 19 ग्रामपंचायतचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले आहे सन 2010 सन 2011 मध्ये 985, सन 2011 – 2012 95, . तसेच सन 2012-13 मध्ये 28 ग्रामपंचायतचे लेखापरीक्षण पूर्ण झाले होते व सन 2009 – 2010 पूर्वीच्या लेखापरीक्षणास दप्तर उपलब्ध न झालेले ग्रामपंचायत ची संख्या 49 आहे या 49 ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षणाचे दप्तर उपलब्ध नाहीत यातील 9 ग्रामपंचायतीचे दप्तर हे तत्कालीन ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले असल्यामुळे उपलब्ध झालेले नाहीत
तसेच दोन ग्रामपंचायतचे दप्तर फौजदारी प्रकरणात न्यायालयात जमा झालेले आहे त्याचबरोबर 8 ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामसेवक मयत असल्यामुळे उपलब्ध झालेले नाहीत. यातील 30 ग्रामपंचायतीचे दप्तर लेखापरीक्षणासाठी उपलब्ध झालेले नव्हते याबाबत तत्कालीन आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व कोल्हापूरचे उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी खुलासा मागणी केली होती.
पण लेखापरीक्षण बाबत काही ग्रामपंचायतींचेवर पंचायत समिती कडुन केलेल्या कारवाई बाबत जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे मागणी केली त्या प्रमाणे जिल्हा परिषदेने पंचायत समितीकडे अहवाल मागणी केला यातून 48 ग्रामपंचायतीमधील या पाच ग्रामसेवकाकडून प्रत्येकी 25 हजार रुपये दंड लावण्यात आला व त्याची वसुली करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने सांगितले त्याचबरोबर अद्यापही काही ग्रामसेवकांवर कारवाईसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे त्यांचा आदेश आल्यावर उर्वरित ग्रामसेवकांवर दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे.