DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी: अनिल डाके
हातकणंगले : हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील मुडशिंगी या गावी सकाळी पोलीसांनी रेड टाकून एका शेता मध्ये विहीरीच्या जवळ गावठी हातभट्टी सुरु असलेचे मिळून आले. सदर ठिकाणी प्लास्टिक पोत्या मध्ये 740 लिटर कच्चे रसायन एकूण 37000 हजार रुपये किंमत व पत्राच्या डब्या मध्ये 560 लिटर तयार दारू किंमत 33600/- असा एकूण 70600 किंमतीचा मुद्देमाल जागेवर नाश करून इतर साहित्य व साधने यांची विल्हेवाट लावली असून यावेळी आरोपी कुमार गुजले. व 30 रा. मुडशिंगी यांचे वर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव तोदले, पोलीस कॉ, महादेव खेडेकर, सु्वास गायकवाड, पो कॉ अतुल निकम, लखन सावंत यांनी कामगिरी केली.