DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री: साक्री येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा जागतिक महिला दिनी म्हणजे दिनांक 8 मार्च 2023 रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सिद्धांत सिनियर कॉलेज पंढरपूर देवनगर येथे होणार आहेत विजेता महिला व मुलींसाठी प्रथम बक्षीस 1001 व प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस रुपये 701 व प्रमाणपत्र तृतीय बक्षीस रुपये 501 व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ही स्पर्धा सर्व वयोगटातील महिला व मुलींसाठी खुली असून दिनांक चार मार्च 2023 पर्यंत 20 रुपये प्रवेश शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करावा स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी प्रवीण सोनवणे मोबाईल क्रमांक 9423218217 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.