DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी: अकिल शहा
साक्री : भारतीय जनता पार्टीचे शैलेंद्र आजगे यांची भाजपा उत्तर महाराष्ट्र विभागातील पंचायतराज व ग्रामविकास जळगाव जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या विषयीचे पत्र खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते शैलेंद्र आजगे यांना नुकतेच देण्यात आले. या पदी निवड झाल्याने त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विविध पदांवर शैलेंद्र आजगे यांनी कार्य केले आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क, वकृत्व कौशल्य व संघटनात्मक बांधणी या मध्ये त्यांची हातोटी असल्याने वरिष्ठांकडून त्यांना नेहमी विविध पदांची जबाबदारी देण्यात येते. धुळे लोकसभा विस्तारक व भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देखील त्यांना या आधीच देण्यात आली आहे.
पंचायत राज व ग्रामविकास विभागातील विविध योजनांची माहिती व लाभ ग्रामीण भागातील जनसामान्यांना शैलेंद्र आजगे यांच्या माध्यमातून अधिकाधिक होईल असा विश्वास व्यक्त करून भाजपाचे पंचायत राज व ग्राम विकास विभाग उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक रोहिदास धुमाळ यांनी आजगे यांची नियुक्ती केली आहे.याबद्दल त्यांचे माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ हिना गावित, आमदारअमरीशभाई पटेल,, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी व विभाग संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नारायण जी पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब सुरेश रामराव पाटील, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस डी एस गिरासे सर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब खलाणे, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, साक्री विधानसभा प्रमुख इंजिनियर मोहन सूर्यवंशी, युवा नेते भैय्यासाहेब चंद्रजीची पाटील, साक्री मंडल अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, साक्री शहराध्यक्ष कल्याणजी भोसले, आदींनी अभिनंदन केले आहे.