DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी: कैलास माळी धुळे : लोकसेवक अशोक चिंधू गुजर, मंडळ अधिकारी, वाघाडी, ता. शिरपुर यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले म्हणुन गुन्हा दाखल.
तक्रारदार हे मौजे वकवाड, ता. शिरपुर येथील रहीवाशी असुन त्यांची मौजे वकवाड़ येथे वडीलोपार्जित शेत जमिन आहे. सदर शेत जमिनीमध्ये विहीर नसतांना ७/१२ उता-यावर चुकीने विहिर असल्याची नोंद झालेली असल्याने तक्रारदार यांना सदर शेत जमिनीत विहिरी साठी शासकीय अनुदान मंजुर होण्यासाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी ७/१२ उता-या वरील चुकीने झालेली विहीरीची नोंद कमी करण्यासाठी तलाठी वकवाड यांच्याकडे अर्ज केला असता तलाठी वकवाड यांनी सुमारे ५ महीन्यांपूर्वी विहिरीची नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेतलेली आहे.
सदरची नोंद ही मंडळ अधिकारी यांनी मंजुर केल्या शिवाय विहिरीची नोंद कमी होत नसल्याने तक्रारदार यांनी वेळो-वेळी मंडळ अधिकारी अशोक गुजर यांना भेटुन त्यांना विहीरीची नोंद कमी करणेबाबतची फेरफार नोंद मंजुर करणे बाबत विनंती केली असता, मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेत जमिनी संदर्भात यापुर्वी केलेल्या हक्कसोडच्या कामाचे बक्षीस म्हणुन तसेच ७/१२ उता-यावर चुकून झालेल्या विहीरीची नोंद कमी करण्याबाबतची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे १५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि.०८.०५.२०२३ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनी दारे माहीती दिली होती.
सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपुर येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तक्रार नोंदवुन सदर तक्रारीची दि. ०८/०५/२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे शेत जमिनी संदर्भात यापुर्वी केलेल्या हक्कसोड कामाचे बक्षीस म्हणुन तसेच ७/१२ उता-या वरील विहीरीची चुकीने झालेली नोंद कमी होणेबाबतची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तडजोडी अंती १०,०००/- रू. पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांचे शिरपुर येथील मिलींद नगर मधील राहते घरी घेवुन येण्यास सांगीतले होते.
दि.०९/०५/२०२३ रोजी मंडळ अधिकारी अशोक गुजर यांच्या शिरपुर येथील राहते घरी सापळा लावला असता मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांच्या कडुन १०,०००/- रुपये लाच स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.