नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेवाळी (दा.) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी येथे आज दिनांक 26 जून 2023 रोजी चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक काम उत्तम होण्यासाठी शेवाळी केंद्रात शिक्षण परिषद घेण्यात आली. जिल्हा परिषद केंद्र शाळा शेवाळी येथील विद्यार्थ्यांनी इशस्तवन म्हटले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेवाळी केंद्राचे केंद्रप्रमुख शिवदास चव्हाण हे होते. व्यासपीठावर साधन व्यक्ती अन्सारी मॅडम, केंद्र मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे, मुख्याध्यापक मधुकर पाटील, योजना शेवाळे या उपस्थित होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी आलेल्या सर्वांचे कृतीयुक्त स्वागत गीतातून स्वागत केले. कार्यक्रमात नवीन बदली करून आलेल्या सर्व शिक्षकांचा स्नेहपूर्वक सत्कार, परिचय करण्यात आला. त्यानंतर अन्सारी मॅडम यांनी नवोपक्रम स्पर्धा व व्हिडिओ निर्मिती स्पर्धा याविषयी मार्गदर्शन पीपीटी द्वारे करण्यात आले. शैक्षणिक उपक्रमाची यशोगाथा यात प्रतिभा साळुंखे यांची निवड केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. केंद्रप्रमुख शिवदास चव्हाण यांनी शैक्षणिक आढावा घेऊन मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद उत्कृष्ट रित्या व्हावी यासाठी शाळेच्या शिक्षिका चंदन सोनवणे, प्रतिभा साळुंके, संगीता पाटील, चित्रांगा भावसार, रेविता लोखंडे, मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा साळुंके यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे यांनी मानलेत. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:32 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!