DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अनिल इंगळे.
रावेर : रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील मांगलवाडी येथील रहिवाशी उत्तम मंगू हिवराळे यांच्या मालकीची मोटर सायकल एम.एच. १९ डिसी १२८४ या क्रमांकाची मोटर सायकल त्यांचे घरासमोरून ३० मे रोजी चोरीस गेली होती.याबाबत उत्तम हिवराळे यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस स्टेशन ला भाग ५, गुरनं १००/२३ भादंवी कलम ३७९ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात मांगलवाडी येथील संशयित आरोपी आकाश कोळी वय २० वर्ष याची सखोल चौकशी केली असता फिर्यादीची मोटर सायकलची चोरी करून मित्राच्या मदतीने विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची मोटर सायकल पोलिसांनी हस्तगत केली असून अजून गुन्हे उघडकीस येण्यासाठी व सोबत असलेला आरोपी अटक करण्यासाठी त्यास मा. रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास १९-६-२३ पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मिळाले आहे. सदरची कार्यवाही फैजपूर विभाग डिवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश धुमाळ, पीएसआय काशिनाथ कोळंबे, पीएसआय रा.का. पाटील, पो.ना. ईश्वर चव्हाण, पो.काॅ. अमोल वाघ, पो. काॅ. रशीद तडवी, यांनी कामगिरी केलेली असून पुढील तपास पोलीस नाईक ईश्वर चव्हाण करीत आहे.