अप्पर जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व दुय्यम निबंधकासह 38 खाजगी आरोपींवर एसीबीने केले गुन्हे दाखल…
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी: नारायण कांबळे.
“भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड असून ही कीड आता खालून वरपर्यंत सर्वच स्तरात पर्यंत पोहचली असून त्याची कितीही सखोल तपास केला तरी भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे ही एक मोठी डोके दुखी होऊन बसलेली आहे. पाहिले अधिकारी व कर्मचारी हे एकट्या स्वतःसाठी लाच घ्यायचे मात्र आता ह्या भ्रष्टाचारी मंडळींनी खालून वरपर्यंत पूर्ण साखळीच तयार केली असून त्यांना आत्ता खाजगी इसम देखील कामाला लागत आहेत. म्हणून ही सर्व मंडळी झुंड ने भ्रष्टाचार करतांना दिसत आहेत.”
अहमदनगर : शासकीय कार्यालयात कोणतेही काम हे कुणा एकाकडे नसते त्यामुळे त्यात एकमेकांना सामील करून घेतल्याशिवाय काही पर्याय नसतो. असाच साखळी करून सर्वत्र भ्रष्टाचार केला व करविला जात असल्याने त्याची पाळेमुळे पार खोलवर रूजली आहेत. राज्यातील लाचलुचपत विभागाने कितीही कारवाया केल्या तरी त्याचे निर्मूलन मात्र समाजातील प्रत्येक व्यक्तीत जन किंवा वृत्तीत सुधारणा झाल्या शिवाय शक्य नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ हा आता कालबाह्य झाला असून त्यात फार मोठ्या सुधारणा होणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे लाच घेताना पकडल्या गेल्यास किंवा तसा गुन्हा दाखल होताच सरकारी सेवेतील त्या व्यक्तीस नोकरीवरून कायम स्वरूपी बडतर्फ करणे हाच एकमेव इलाज उपयोगी ठरू शकतो.