DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री : शेवाळी (दा.) ग्रामस्थांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस नवीन बायपास मार्गे जात होत्या त्यामुळे शेवाळी गावातील प्रवासी यांना गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती उतरावे लागत असल्याकारणाने वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात दर्शन पोलीस टाइम या वृत्तपत्रात दिनांक १६ जुलै रविवारी रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव यांनी तात्काळ दखल घेवून दि.१८ जुलै रोजी सर्व चालक – वाहक यांना साक्री-धुळे महामार्गावरील शेवाळी गावाजवळील नवीन बायपास मार्गे वाहतूक न करता जुन्या मार्गानेच गावातून वाहतूक करावी अशा सूचना दिल्या व फलकावर देखील त्याबाबतीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच राज्यातील इतर आगाराना या विषयी पत्राद्वारे कळविले जाईल अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.