आरोपी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व खाजगी इसम ऋषी शुक्ला
DPT NEWS NETWORK 🗞️✍️📰
जळगाव :- बुलढाणा येथील तक्रारदार यांच्या मित्रास भुसावळ बाजारपेठ येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी राहुल बाबासाहेब गायकवाड पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ जिल्हा जळगाव व पोलीस नाईक तुषार पाटील (ब.नं. 303) यांनी खाजगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला, हनुमान वाडी भुसावळ जिल्हा जळगाव याला सांगुन व प्रोत्साहित करून तक्रारदार यांच्या कडून 500000/- लाख रुपये लाचेची मागणी करण्यास सांगितले व तडजोडंती तीन लाख रुपये घेण्याचे ठरले त्या लाचेचे 300000/- लाख रुपये रोख स्वीकारताना खाजगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला यास पंचांसमक्ष लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाने रंगेहात पकडले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
👇👇 वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले 👇👇
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
▶️ *सापळा अधिकारी*
अभिषेक पाटील पोलीस उप अधिक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे मो नं.8888881449 सहायक सापळा अधिकारी :- पो. ह. राजन कदम, पो. कॉ. संतोष पावरा, पो. कॉ. रामदास बारेला, पो. हवा चालक सुधीर मोरे, सर्व लाप्रवि धुळे विभाग यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क करावा.* दुरध्वनी क्रमांक- 02562224020/ मो.8888881449, टोल फ्री क्रमांक १०६४