DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनील मैदीले
भिवापूर :- शेतातील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा करंट लागून मृत्यू झाला. सदर घटना भुदान परिसरात घडली.
विष्णू नागपुरे 45 (रा. प्रभाग क्र.7 भिवापूर ) असे मृतकाचे नाव आहे. मृतक विष्णू याने भुदान परिसरातील मधुकर रामटेके यांचे शेत भाड्याने घेतले आहे. या शेतात शिंगाड्याचे पीक घेतले जाते. शिंगाड्याच्या बांधीत पाणी सोडायचा असल्याने दुपारी विष्णू मोटार सुरु करायला गेला. स्वीचला स्पर्श करताच त्याला विजेचा जोराचा झटका बसला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. संतोष नागपुरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून हेड कॉन्स्टेबल अशोक ठाकूर पुढील तपास करीत आहे.