DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- देशात रस्ता सुरक्षा माहचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व सीमा तपासनी नाक्यांवर रस्ता सुरक्षा चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे.
त्यानुसार धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर दि.18 जानेवारी 2024 रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह च्या निमित्ताने वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार, सचिन दळवी, मो.वा.नि. राहुल जाधव, मो.वा.नि. नरेंद्र जाधव यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात वाहन चालकांना मार्गदर्शन केले. वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले, माहिती पत्रकांचे वाटप केले, वाहन चालकांना अपघाता झाल्यानंतर ॲम्बुलन्स चे महत्त्व पटवून दिली, वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याबद्दल माहिती देण्यात आली. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा तपासणी हाडाखेड, प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, शिरपूर टोल प्लाजा व एम बी सी पी एन एल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने वाहनधारकांना रिफ्लेक्टर टेप, माहितीपत्रक वाटप केले. लाला कुर्वे, शिरपूर टोल प्लाझा मॅनेजर, संदीप पाटील मॅनेजर एम बी सी पी एन एल यांनी परिश्रम घेतले.