DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: माझ्या भिमाची सावली दिन दलितांची आई, अशी भाग्यशाली त्याग मूर्ती माझी आई माता रमाई, आज त्याग मूर्ती माता रमाई यांची 126 वी जयंती निमित्त साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात माता रमाई यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी सोनवणे(गिरे) मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी मोफत फळ व बिस्किट वाटप केले. त्यानंतर डॉ. आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम वाघ, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रवक्ते राजेंद्र वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाघ, साक्री तालुका अध्यक्ष नितीन मोहिते, तालुका उपाध्यक्ष नानासाहेब वाघ, युवा अध्यक्ष दीपक वाघ, सचिव शशिकांत वाघ, शहराध्यक्ष पवन वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते आरडी साळवे, डी.एम.मोहिते, जी.एन.मोरे, अनिल मगर, सुभाष चव्हाण संजय थोरात, नामदेव पिपळे, भूषण चव्हाण, मुस्ताक पिंजारी, गौरव मोहिते, महिला अध्यक्ष लताबाई थोरात, रेखाबाई चव्हाण, नलुताई मोरे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.