DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे – सध्या टेक्नालॉजी ही फार अत्याधुनिक झाली आहे त्याचा फायदा सायबर गुन्हेगारांनी सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार म्हणजे व्हॉईस क्लोनिंग. नेमके यात आपल्याला प्रश्न पडला असेल की व्हॉईस क्लोनिंग म्हणजे नेमके काय? व्हॉईस क्लोनिंग म्हणजे आपला आवाज हुबेहुब वापरुन आपल्या मित्र नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींना आपल्या नावाने पैशांची मागणी करणे होय. हल्ली बहुतांश लोकांसोबत व्हॉईस क्लोनिंग फॉड झाल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. तसेच बरेच नागरीक व्हॉईस क्लोनिंग फॉडला बळी पडल्याचे दिसत आहे. जर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नावाने अज्ञात नंबरवरुन कॉल येतो आणि आपल्याला सांगण्यात येते की, मी अमुक बोलतोय, मी काही अडचणीत आहे किंवा माझे अॅक्सीडेंट झाले आहे त्यामुळे मला त्याकरीता अर्जंट काही रक्कम मला या नंबरवर टाक असे तो सांगतो आणि तेथेच याला आपण बळी पडतो. कारण तो अज्ञात नंबर सायबर गुन्हेगारांचा असतो आणि ते आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करुन सायबर गुन्हेगार आपल्या जवळच्या व्यक्तींचे हुबेहुब आवाजाचा गैरवापर करुन नागरीकांना फसवण्याचा एक नविन फंडा या सायबर गुन्हेगांरानी शोधला आहे. म्हणून जर आपल्याला अज्ञात नंबरवरुन आपल्या जवळचे व्यक्तीचे पैशांसाठी कॉल आला असेल तर त्याबाबत आपल्या मित्राला त्याच्या ओरीजनल नंबरवर कॉल करुन त्याबाबत खात्री करा आणि त्यानंतरच आर्थिक व्यवहार करा. तरी नागरीकांनी व्हॉईस क्लोनिंग फ्रॉड पासून सावध रहावे असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.