नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

“श्री संत काशिबा गुरव महाराज की जय”… या घोषवाक्यसह धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाच्या यशस्वी ऐतिहासिक उपक्रम.

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – संजय गुरव

धुळे येथील गुरव समाजाची तीन राज्याची मायबोली संस्था गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्थेचा भवनावर गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा गुरव महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात आला.
महादेवाचे पुजारी म्हणून ओळखला जाणारा गुरव समाज संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेला आहे.देशभरातील गुरव समाज पूर्वीपासूनच महादेवाची पूजा करत आलेला आहे.गुरव समाजाचा प्रमुख व्यवसाय बेलफुल वाटप करणे तसेच शहनाई वाद्य करणे असून याशिवाय देशभरात विविध व्यवसायात सुद्धा हा समाज प्रगती करत आहे.
अशा या गुरव समाजाचे आराध्य दैवत म्हणून श्री संत काशिबा गुरव महाराज यांचे नाव घेतले जाते.श्री संत काशिबा महाराज यांचा कोणत्याही ठिकाणी सामाजिक स्थळावर पुतळा नव्हता याच्या खंत संपूर्ण समाजाला होता.
धुळे येथील धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळ चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सर्वांनी मिळून श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करून.गुरव समाजात एक नवीन ऊर्जा निर्माण केलेली आहे.
काल दि.8 मार्च,2024 शुक्रवार रोजी महा-शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळ श्री संत काशीबा गुरव महाराज यांचा पुतळा विधिवत गुरव समाजाची तीन राज्यांची मायबोली संस्था गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्था धुळेच्या भवनावर बसवण्यात आला.संपूर्ण गुरव समाजासाठी हा गर्वाचा व अविस्मरणीय प्रसंग होता.या शुभ कार्यामध्ये गुरव समाजातील संपूर्ण देशातील विविध पुढारी,विविध मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच गुरव समाज बंधू भगिनी व लहान बालगोपालांची हजेरी लावली.
गुरव समाजासाठी हा सोहळा एक ऐतिहासिक सोहळा म्हणून प्रसिद्ध झाला.श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुतळा बसवणे हा एक मोठा उपक्रम करण्याचे श्रेय धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाला जाते.
धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत बेगराज सूर्यवंशी यांचे वडील कै.बेगराज यादव सूर्यवंशी यांचे निधन झाले होते त्यावेळेस त्यांच्या उत्तर कार्याच्या दिवशी वडिलांच्या स्मरणार्थ शशिकांत बेगराज सूर्यवंशी यांनी संकल्प केला होता की आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात येणार व गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्था धुळेच्या भवनावर श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुतळा वडिलांच्या स्मरणार्थ बसवण्याचे जाहीर केले.वडिलांचा उत्तर कार्याच्या दिवशी दिलेला शब्द शशिकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या गुरव समाज संपर्क विकास मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने संपूर्ण गुरव समाजाच्या उपस्थितीत दि.8 मार्च 2024 शुक्रवार रोजी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हा क्षण म्हणजे गुरव समाजासाठी एक सण म्हणूनच प्रसिद्ध झाला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुंबई येथील गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर देवरे यांना देण्यात आले.धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाद्वारे बुलढाणा येथील माजी आमदार विजयराज शिंदे यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमामुळे गुरव समाजात एक आनंदाची धारा वाहू लागली.संपूर्ण गुरव समाज गौरव पूर्ण क्षण साजरा करत आहे.
कार्यक्रमात विशेष मान्यवर म्हणून धुळ्याचे ग्रामीण आमदार कुणाल पाटील,धुळे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख अनुपजी अग्रवाल,माजी महापौर नगरसेवक चंद्रकांत सोनार,शिंदे गटातील उत्तर महाराष्ट्र युवा सेना सचिव आविष्कार भुसे,धुळे जिल्हा ग्रामीण सह संपर्क प्रमुख हिलाल माळी,माजी स्थायी समिती सभापती व मनपा नगरसेविका बालीबेन मंडोरे तसेच माजी नगरसेवक चंद्रकांत गुरव आदी उपस्थित होते.
हरि भक्त पारायण करणारे गुरव समाजातील सर्व महाराज नरेंद्र गुरव(मालेगाव),महेंद्र पवार(झोडगे),वासुदेव सोनवणे(रावळगाव),जयदेव गुरव(अमळनेर),योगेश पवार(मालेगाव),मेघशाम निकम(नाशिक),सोपान सोनवणे(नाशिक),बाबूलाल सोनवणे(रावळगाव) यांच्या सहकार्याने श्री संत काशिबा महाराजांची एक मोठी मिरवणूक आई एकविरा मातेच्या मंदिरापासून ते गुरव समाज उन्नती संस्थेच्या भवना पर्यंत काढण्यात आली.या मिरवणुकीमध्ये गुरव समाजातील जवळजवळ 400 महिला एकाच रंगाच्या साड्यांमध्ये सहभागी झाल्या.गुरव समाजातील विविध भागातील विविध मान्यवर तसेच गुरव समाज बंधू-भगिनी व अनेक विद्यार्थी जवळ जवळ हजार ते 1500 लोकांच्या उपस्थितीत ही भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर गुरव समाज उन्नती संस्थेच्या भवनावर उपस्थित असलेले मान्यवर गुरव समाज उन्नती संस्थेचे मुख्य विश्वस्त नंदकुमार हिलाल गुरव,ह.भ.प.नरेंद्र रुपचंद गुरव,आर टी.ओ.सुनिल बाबुराव गुरव,गुरव समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष भीमराव शंकर गुरव,शिवसेवा गुरव प्रतिष्ठान नाशिकचे संस्थापक अध्यक्ष संजय महादु गुरव यांनी दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.उपस्थित मान्यवर बुलढाणा येथील माजी आमदार विजयराज शिंदे,मुंबई येथील पद्माकर देवरे साहेब,अहमदाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गुरव,करण खेडे येथील उपसरपंच गणेश शांताराम गुरव,धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाचे विश्वस्त विनोद हिरामण गुरव यांच्या हस्ते श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुतळा अनावरण करण्यात आला.गुरव समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वासराव भामरे,भा.ज.पा. नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्रविण गुरव,आई एकविरा माता मंदिर धुळ्याचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव,गुरव समाज उन्नती संस्थेचे माजी जनरल सेक्रेटरी नानाभाऊ गुरव,भा.ज.पा.महाराष्ट्र राज्य कामगार मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य भूपेंद्र गुरव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी पुस्तक प्रकाशन सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता.सदर कार्यक्रमात गुरव समाज उन्नती संस्थेचे प्रभारी अध्यक्ष राकेश गुरव,साकेगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गुरव,दाभाडी(मालेगाव)येथील उद्योजक पंडित गुरव,भा.ज.पा.ओबीसी मोर्चा धुळे जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश गुरव,गुरव समाज उन्नती संस्था च्या कोषाध्यक्ष सोनाली ताई गुरव यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा करण्यात आला.
आठ मार्च म्हणजे ” जागतिक महिला दिवस ” याचे औचित्य साधून गुरव समाज उन्नती संस्था संचालित महिला जागर समितीच्या सुद्धा हळदीकुंकू व महिला स्नेह-संमेलनाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कोषाध्यक्ष सोनाली ताई गुरव,लोणखेडा येथील महिला जागर समितीच्या अध्यक्ष ज्योत्सना ताई गुरव,बडोदा येथील सचिव भारतीताई देवरे व निर्मलाताई पुजारी,चोपडा येथील उपाध्यक्ष संगीताताई गुरव,नंदुरबार येथील कविता ताई गुरव यांनी महिला जागर समितीचा सुंदर हळदी कुंकू चा कार्यक्रम केला.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अनुपमा ताई गुरव, भावना ताई गुरव,दहीवेल येथील ज्येष्ठ समाज सेविका सुमनबाई देवरे, शोभाताई सूर्यवंशी,कल्पना ताई साठे,सुशिला ताई सूर्यवंशी तसेच समाजातील विविध भागातील महिला सदस्य सुद्धा उपस्थित होते.
संपूर्ण सोहळा हा आध्यात्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून अध्यात्मला विशेष महत्त्व देण्यात आले होते.या सोहळा मध्ये भारत भरातील गुरव समाजातील अनेक समाजसेवक,विविध मंडळातील अध्यक्ष तसेच त्या मंडळातील पदाधिकारी,गुरव समाज बंधु भगिनी सहभागी झालेले होते.
श्री संत काशिबा गुरव महाराज यांच्या पुतळा शशिकांत सूर्यवंशी यांनी स्वखर्चाने बसवला. इतर खर्च समाज गंगेचा माध्यमाने मिळवलेला होता. गुरव समाजातील अनेक मान्यवरांनी व समाज सेवकांनी अन्नदान साठी सहकार्य केले होते.
या सोहळा साठी विशेष योगदान देणारे धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत बेगराज सूर्यवंशी, विश्वस्त भीमराव शंकर गुरव, विनोद हिरामण गुरव, सुनील गुलाबराव शिंदे, डॉ.अरुण निवृत्ती गुरव, अध्यक्ष योगेश दिलीप गुरव, सचिव गणेश दगडू गुरव, उपाध्यक्ष निलेश रामचंद्र गुरव, कोषाध्यक्ष राकेश प्रकाश गुरव, प्रवक्ते नितीन दुलिचंद गुरव, सल्लागार नानाभाऊ झुलाल गुरव, अशोक डी.ठाकरे, लोटन डी.चव्हाण, विजय दगडू सूर्यवंशी, सदस्य राजेश कांतीलाल गुरव,महेश सुरेश गुरव,गणेश आधार गुरव, मयूर सुरेश गुरव,जयंत दिनानाथ गुरव,अमोल सुदाम सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख भानुदास कृष्णा गुरव तसेच धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळातील सर्व सदस्य व धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास महिला मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने सदर सोहळा उत्साहात पार पाडला. सर्व समाज समान आहे याची भावना जोपासत संपूर्ण समाजाला समान भावनाने सन्मान देण्यात आला.या कार्यक्रमाचे भारत भरातील गुरव समाजात कौतुक केले जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:29 pm, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!