DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी (दा) येथे भगवान विर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील सर्व समाजाच्या मान्यवरांच्या हस्ते सकाळी ९ वाजेच्या सुमारास भगवान वीर एकलव्य यांच्या फलकाचे पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करीत आदिवासी बांधवांनी मोठा जल्लोष साजरा केला.विशेष म्हणजे गावातील आदिवासी बाधवांसाठी एकलव्य जयंती च्या निमित्ताने गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व गावातील सलोखा व एकतेचे दर्शन घडवून एक चांगला संदेश देण्यात आला, या वेळी एकलव्य आदिवासी युवा संघटना प्रांतिक सचिव उत्तम माळचे यांनी भगवान वीर एकलव्य यांच्या जीवन चरित्र्यावर प्रबोधन केले व तसेच गावातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित राहिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले या वेळी शेवाळी विभाग प्रमुख सुपडू माळचे, बन्सी माळचे, नाना तीरसिंग, जयराम माळचे, साहेबराव मोरे, रशीद शहा, भिकन मन्सुंरी, फिरोज शहा, हबीब शहा, इब्राहिम मंन्सूरी, नसीर शहा, जुबेर मंन्सुरी, चांद भाई पिंजारी, फरीद पिंजारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*शेवाळीत प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय पाठशाळातर्फे 88 वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.*
आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने पाठशाळेमध्ये महाशिवरात्रीचे महत्त्व, शिवशंकर यामधील अंतर, परमात्मा शिवाचा यथार्थ परिचय उपवासाचा अर्थ, बद्दल ब्रह्माकुमारी कविता दीदी यांनी प्रबोधन केले.
त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला प्रदर्शनी समजावण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी शेवाळी गावाच्या सरपंच श्रीमती सुरेखाताई साळुंखे, डॉ. वैभव साळुंखे, डॉ.मंजुषा साळुंखे व गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच सेंटरला येणाऱ्या सगळ्या बंधू आणि माता भगिनी मोठया संख्येने उपस्थिती होते संपूर्ण कार्यक्रम परमात्म्याच्या यात मध्ये ब्रह्माकुमारी कविता दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.