DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा
साक्री : धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील म्हसदी प्र. नेर येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालकाकडून व त्याच्या भावाकडून तलाठ्यास मारहाण करीत ट्रॅक्टर व ट्रॉली पळवून नेल्याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात कलम ३५३,३७९,३२३,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात तलाठी अमोल बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दि.१५/०३/२०२४ रोजी सकाळी ११:४१ वाजेच्या सुमारास ते साक्री येथील तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाज करीत असतांना, म्हसदी शिवारातील सापटे नाला येथे ट्रॅक्टर द्वारे अवैधपणे वाळू उपसा चालू आहे याबाबत त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना घटनेबाबत माहिती दिली त्यांच्या परवानगीने मंडळ अधिकारी अनिल बाविस्कर साक्री, मंडळ अधिकारी गजानन सोनवणे म्हसदी प्र.नेर, संदेश नेरकर (मंडळ अधिकारी) बल्हाणे, नितीन देसले (तलाठी )भाडणे, प्रमोद निकम (पोलीस पाटील )व ते स्वतः शासकीय वाहनाने म्हसदी प्र.नेर शिवारातील सापटे नाला पात्रात पोहचले असता त्यांना त्या ठिकाणी लाल रंगाचे मॅसी फरगुशन डी.आय 1035 कंपनीचे विना नंबर चे ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू सह भरलेले आढळून आले असता त्यांनी ट्रॅक्टर जवळ जाऊन ट्रॅक्टर चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने नितीन मधुकर शिंदे रा. ककाणी ता. साक्री जि. धुळे असे सांगितले त्यास त्यांनी सदर वाळू वाहतुकीचा परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडविचे उत्तर दिल्याने त्यास सदर ट्रॅक्टर बाहेर काढून साक्री येथील तहसील कार्यालय येथे नेण्यास सांगितले परंतु त्याने खाली उतरून पथकातील तलाठी नितीन देसले यांना मारहाण करून त्यांच्या हाताला दुखापत केली व इतर लोकांशी जोरदार झटापटी केली. त्यानंतर त्याचा भाऊ कुणाल मधुकर शिंदे तेथे येवून त्यानेही पुन्हा आमच्या पथकातील लोकांशी झटापटी केली तसेच त्या दोघांनी सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे दरवाजे दादागिरी करून मोकळे केले ट्रॉलीतील वाळू रिकामी केली तसेच पथकातील कोणालाही न जुमानता जोरात ट्रॅक्टर ट्रॉली पळवून नेले त्यांचा काही किलोमीटर अंतरावर पाठलाग केला परंतु ते सापडले नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे करीत आहेत.