नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्रीत जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री :- साक्री तालुका ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक ग्राहक हक्क दिन तहसील कार्यालय साक्री येथे साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार साहेबराव सोनवणे हे होते. तर या प्रसंगी साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें यांनी उपस्थितांना ग्राहक हक्क दिनाच्या चालू वर्षी च्या थीम विषयी व सजग ग्राहक या नात्याने घ्यावयाची दक्षता या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून तहसीलदार सोनवणे यांनी आर्टीफिशियल इंटेलीजन्सच्या माध्यमातून होणा-या फसवणुकी बाबत सजग राहण्याचे आवाहन केले व साक्री तालुका ग्राहक पंचायतीच्या ग्राहक प्रबोधन कार्या बद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी आणि ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अप्पर तहसील पिंपळनेर शेजुळ साहेब, जिल्हा सह संघटक पी झेड् कुवर, सुरेश भाऊ पारख , दिपक नांद्रें, मनोहर भामरें आदि पदाधिकारी उपस्थित होते. ग्राहक तिर्थ बिंदू माधव जोशीं व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपक प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून सुरूवात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव विलास देसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षक राकेश साळुंखे, लिपिक नितीन मिरास, भूषण पाटील, पुरवठा स्टाफ सचिन कासार, रवींद्र वळवी, जितेंद्र महाले यांनी परिश्रम घेतले.
तसेच साक्री येथील श्रीमती विमलबाई पाटील महाविद्यालयातही जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी. एस.सोनवणे होते.जिल्हा सहसंघटक पी.झेड् कुवर, साक्री तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें, सचिव विलास देसले, साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाऊ पारख, प्रा.अजय नांद्रे, मनोहर भामरे, दिपक नांद्रे, सुवर्णा देसले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम.भामरे यांनी केले. तर प्रमुख मार्गदर्शक पी. झेड.कुवर यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याने आपण प्रत्येक ग्राहकाला कोणते हक्क दिले आहेत व विद्यार्थ्यांने या वयात ग्राहक या नात्याने सजगता तथा जागरुकता नेमकी कशी व केव्हा बाळगायची या विषयीचे सोदाहरण सखोल मार्गदर्शन केले.ग्राहक संरक्षण कायदा व त्याचे नवे स्वरूप आणि आर्थिक फसवणूकी बाबत जिल्हा, राज्य व केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंच व आयोग याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव विलास देसले यांनी केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!