नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रेवतकर यांचे आरोप तत्थहीन : सरपंच मंजुषा जीभकाटे

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले

भिवापूर :- पाणी टंचाईच्या कामात गैरप्रकार केल्याचा उपसरपंच रेवतकर यांचा आरोप निराधार असल्याचे सांगत रेवतकर यांना प्रत्येक कामाची तक्रार करायची सवय जडली असल्याचे मत मांगरूळ ग्रामपंचायतच्या सरपंच मंजुषा जीभकाटे यानीं मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

फोटो – पत्रपरिषदेत माहिती देतांना मांगरूळच्या सरपंच मंजुषा जीभकाटे


ग्रामपंचायत तर्फे करण्यात आलेल्या पाणी टंचाईच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप उपसरपंच गब्बर रेवतकर यांनी पत्रपरिषदेतून केला होता. त्याबद्दल सरपंच मंजुषा जीभकाटे रविवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होत्या. पाणी टंचाईच्या कामाचे पंचायत समितीच्या अभियंत्याने मूल्यांकन व काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर कामाचे देयके संबंधितांना देण्यात आले. ग्रामपंचायत कडून कामात कसलाही गैरप्रकार करण्यात आलेला नसल्याचे जीभकाटे यांनी सांगितले. पं. स. पोटनिवडणुकीची आचार संहिता सुरु असतांना घेण्यात आलेल्या ग्रामसभेत वैयक्तिक लाभाच्या योजनेविषयी कोणताही ठराव घेतला गेलेला नाही. त्यामुळे आचार संहितेचा भंग केल्याचा रेवतकर यांचा आरोप तत्थहीन असल्याचे जीभकाटे यांनी सांगितले.
आमचा गाव, आमचा विकास योजनेअंतर्गत 2024/25 च्या विकास आराखड्याला उपसरपंच गब्बर रेवतकर व त्यांचे सहकारी असलेले ग्रा. प. सदस्य राजेंद्र चट्टे, अर्चना ब्रम्हे, रेखा रेवतकर यांनी ग्रामसभेत विरोध दर्शवीला. विकास कामावर चर्चा सुरु असतांना सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. रेवतकर यांना गावाच्या विकासाशी काहीही देणे घेणे नाही. तक्रारी करून अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असेही सरपंच जीभकाटे यांनी संगितले. पत्रपरिषदेला ग्रा. प. सदस्या अर्चना चहांदे, माजी उपसरपंच स्वप्नील मालके, मुन्ना माटे उपस्थित होते.


शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!