महसूल विभाग मॅनेज ?
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भंडारा :- तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीवर असलेल्या चांदमारा घाटातील चोरीची वाळू रामटेक व मौदा तालुक्यातील वेगवेगळ्या मार्गाने नागपूरला नेली जात असल्याची माहिती आहे.
पवनी वरून नागपुरला होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला नागपूर पोलिसांमुळे काही प्रमाणात ब्रेक लागले आहे. पोलिसांनी भिवापूर मार्गावर कारवाईचा सपाटा सुरु केला. त्याला कंटाळून नागपूरमधील वाळू तस्करांनी त्यांचा मोर्चा अन्य ठिकाणच्या वाळू घाटांकडे वळवीला आहे. तुमसर तालुक्यातील चांदमारा आणी गोबरवाही घाटाला सध्या या वाळू तस्करांनी लक्ष केले आहे. येथून दररोज वाळू भरलेले दीडशे पेक्षा अधिक ट्रक वेगवेगळ्या मार्गाने नागपुरात पोहचत असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड आणी ब्रम्हपुरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू नागपूरला नेली जाते. नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या प्रयत्नांमुळे त्यावर काही प्रमाणात अंकुश लागले आहे. भिवापूर मार्गावर होत असलेल्या पोलीस कारवाईला कंटाळून नागपूर मधील ट्रक मालकांनी आपला मोर्चा तुमसर तालुक्याकडे वळवीला आहे. महाराष्ट्र आणी मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या चांदमारा तसेच गोबरवाही (ता. तुमसर) परिसरातील घाटामधून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जातो. नागपूर शहर तसेच ग्रामीण भागातील वाळू तस्करांची सध्या या घाटावर गर्दी वाढली आहे. येथील वाळू खापा (ता. तुमसर) आंधळगाव, खात, रामटेक, मौदा मार्गे नागपूरला नेली जाते. दररोज दीडशेपेक्षा अधिक वाळूचे ट्रक या मार्गाने धावतांना दिसतात. भंडारा जिल्ह्याचे महसूल प्रशासन वाळू तस्करीला पूर्वी पासूनच अनुकूल असेच आहे. वाळू चोरीमुळे एकीकडे शासनाचे दररोज कोट्यावधीचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तस्करांचे तार जुळलेले आहे. एन्ट्रीच्या रूपात होत असलेल्या लक्ष्मीदर्शनामुळे वाळू चोरीबाबत तोंडातून ब्र काढायची हिम्मत करीत नाही. वरिष्ठान्ना दाखविण्यासाठी अधून मधून छोट्या छोट्या कारवाया केल्या जातात. मात्र त्यांना वाळू तस्कर जुमानत नाही. हे चित्र भंडारा जिल्ह्यात सर्वत्र आढळून येते.
—-> तुमसर तालुक्यातील वाळू वाहतुकीसाठी मध्य प्रदेशातील रॉयल्टीचा वापर केला जातो. मात्र ही रॉयल्टी संदेहास्पद असल्याचे बोलल्या जाते. सदर रॉयल्टीची पालेमुळे खोदून काढण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. ट्रेडिंगचे काम करणारे वाळूची साठवणूक करतात. त्यासाठी झिरो रॉयल्टी आवश्यक आहे. मात्र त्याकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसते. त्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावत आहे.
—–> पवनीत चोर घाट सुरूच
खातखेडा, जुनोना, येनोडा येथे वाळूचे चोर घाट जोरात सुरु आहेत. पवनी तालुक्यातील काही नामांकित वाळू तस्करांसोबत भंडारा व नागपूर येथील तस्कर मिळून वरील घाट चालवीत असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह पवनी तहसील कार्यालयाचे चोर घाट चालवीणाऱ्यांना पाठबळ असल्याने दिवसाढवळ्या वाळूची चोरटी वाहतूक धडाक्यात सुरु असल्याचे दिसून येते.