DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदिप अहिरे
धुळे :- आझाद नगर पोलिस स्टेशनमधील एएसआय दर्जाच्या अधिकार्याला काही महिन्यांपूर्वी पारोळा रोडवर एसीबीने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 12 हजाराची लाच घेताना आझादनगर पोलिस स्टेशनच्या अझरुद्दीनला रंगेहात पकडले आहे.
पानटपरी चालवायची असेल, गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि खाजगी वाहनातून जनावरांची वाहतुक प्रकरणी कारवाई न करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच आझादनगर पोलिस स्टेशनच्या डीबीपथकातील पो. कॉ. अझरुद्दीन शेख याने पानटपरी चालकाकडून मागितली. त्यातील 17 हजार रुपये दि.4 रोजी पारोळा रोड येथे बोलावून तक्रारदाराकडून पो.कॉ. अझरुद्दीनने घेतले, त्यानंतर दि. 5 रोजी तक्रारदाराच्या मोबाईलवर संपर्क साधला उर्वरीत 13 हजार रुपये पंटर बासत अन्सारी याच्याजवळ द्यायला सांगितले. तक्रारदाराने दि.6 रोजी एसीबीच्या धुळे कार्यालयात जावून तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली. दरम्यान तक्रारदाराकडे तडजोडीअंती 12 हजार रुपये लाचेची मागणी पो.कॉ.अझरुद्दीनने केली. ही रक्कम पंटर अब्दुल बासीत अन्सारी याच्याकडे आज दि.7 रोजी मौलवीगंज चौकात तक्रारदाराच्या दुकानासमोर देण्यास सांगितली. एसीबीने सापळा रचून पंटर अन्सारी आणि अझरुद्दीन शेखला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7,7 अ आणि 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील,प्रविण मोरे, प्रशांत बागुल, रामदास बारेला, सुधिर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.