DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टल वरील नोंदणीकृत स्थलांतरित व असंघटित विना शिधापत्रिका धारक कामगारांना शिधापत्रिका वितरित करण्याबाबत संदर्भीय पत्राद्वारे सूचित करण्यात आलेले होते. त्या स्तरावर तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना ती यादी प्राप्त होताच गांभिर्याने दखल घेत समिती नेमून त्यात तलाठी,रेशन दुकानदार व मंडळ अधिकारी व पुरवठा विभाग साक्री यांच्या मार्फत साक्री तहसील ला हे कॅम्प तहसीलदार साहेबराव सोनवणे व नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सुरू करण्यात आले आहे.कॕम्प चे आयोजन करून गाव निहाय तलाठी व रेशन दुकानदार यांना याद्या देऊन ई-श्रम नोंदणीकृत कामगारांना शिधापत्रिका दोन महिन्याच्या आत उपलब्ध होईल यासाठी साक्री तहसील ला दि.१९ तें २१ असे तीन दिवस रोज सकाळी १० वाजेपासून संध्यकाळी ५ वाजेपर्यंत कॅम्प ठेवले आहे. यासाठी साक्री तालुक्यातील पूरवठा विभाग चे साळुंके नाना,भूषण पाटील, तलाठी रोजेकर,तलाठी सूर्यवंशी, तलाठी माळी, मंडळ अधिकारी मनीषा आहिरे, साक्री तालुका रेशन दुकानदार अध्यक्ष दिलीप पवार,व पुरवठा शाखेतील सर्व कर्मचारी व तालुक्यातील रेशन दुकानदार परिश्रम घेत आहे. या कॅम्प ला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.