नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री; अवैधरीत्या डिझेलची चोरी करणाऱ्यांवर, उपनियंत्रक शिधावाटप राज्यस्तरीय पथकासह, साक्री पोलीसांची संयुक्त कारवाई

धुळे सूरत महामार्गावर हॉटेल खालसा पंजाब येथे झाली कारवाई..

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा/ गोकुळ नगराळे

साक्री:-  दि. २१/०६/२०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजेच्या सुमारास हॉटेल खालसा पंजाब, धुळे- सुरत नॅशनल हायवे, बोडकीखडी, ता. साक्री, जि. धुळे येथे टैंकर जी. जे. १६. ए. वाय ५६१८ व टैंकर क्र. जी. जे ०१ डी. व्हि ५६४२ मधुन डिझेलची अवैधरित्या चोरी होत असल्याची बातमी मिळाल्याने राज्यस्तरीय दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप (अंमल) मधुकर बोडके-उपनियंत्रक शिधावाटप, विनायक निकम प्रभारी सहाय्यक नियंत्रक शिधावाटप, सर्वश्री शिधावाटप निरीक्षक प्रकाश पराते, राजीव भेले, सुधीर गव्हाणे, दिपक कदम, विवेक त्रिभुवन, मच्छिद्र कुटे, सागर वराळे, संदीप दुबे व अमित पाटील, श्रीमती अर्चना भगत-प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी धुळे, रोहीत झोडगे-मंडळ अधिकारी, दहिवेल व सोमनाथ कोकणी-तलाठी, दहिवेल यांच्यासह साक्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामलाल अहिरे, पोकों/१४८३ प्रमोद जाधव, पोकी ८१९ मंगेश खैरनार असे हॉटेल खालसा पंजाब, धुळे-सुरत नैशनल हायवे, बोडकी खडी, ता. साक्री, जि. धुळे येथे गेले असता त्यांना टँकर क्र जी. जे.१६-ए. वाय- ५६१८ हा नायरा एनजी लि. खंबालीया पो बॉक्स नं-२४,जि देवभुमी, गुजरात मधुन ३५००० लिटर डिझेलचा भरणा करुन आर. के. ट्रान्सपोर्ट अॅण्ड कन्सट्रक्शन लि. रायपुर छत्तिसगढ़ या ठिकाणी डिझेल खाली करण्याकरीता रवाना झाले असतांना सदरचा टेंकर हा वर नमूद ठिकाणी पार्किंगमध्ये उभा असतांना त्याचेतुन डिझेलची अवैधरित्या चोरी करतांना वरील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तसेच टेंकर क्र जी.जे.०१. ए. वाय- ५६४२ हा टेंकर देखील डिझेलची अवैधरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने थांबला होता. तसेच टाटा ९०९ ई. एक्स क्र. एम.एच.०४ डि.एस ०७४९ चे मालक हे डिझेलची अनधिकृत चोरी, साठवणुक व विक्री करीत असल्याचे दर्शनी आढळून आले. तरी सदर ठिकाणाहुन एकुण ०१,०९,३०,७००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी नामे १) नरेद्र लालमणी सिंग वाहन चालक २) राजीव बच्चुलाल गांधी (गुप्ता) वाहन चालक, ३) चमकोर सुखपाल सिंह – हॉटेल खालसा पंजाब मालक अशांना सदर ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. तसेच ४) टंकर क्रमांक जी जे १६.ए.वाय.-५६१८ चे मालक ५) जी.जे.-०१-डी. व्ही. ५६४२ चे मालक व ६) टाटा ९०९ ई एक्स एम एच.०४-डी.एस-०७४९ चे मालक असे नमुद गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहेत. तरी वर नमूद आरोपीतांवर साक्री पोलीस स्टेशन अभिलेखावर गुरनं २२८/२०२४ अत्यावश्यक वस्तु १९५५ चे कलम ३,७ व ८ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुद गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे सो यांचे मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:26 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!