DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
उमेदवारांना राहण्याच्या व्यवस्थेसह उमेदवारांना मैदानावर कोणताही त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल घेत आहे.
कोल्हापूर :- दिनांक 20/06/ 24 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी व रात्री पावसाच्या मोठ्या प्रमाणात सरी आल्या. त्यामुळे पोलीस भरतीचे मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. पोलीस भरती घ्यायची किंवा कसे? याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झाले होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित साहेब यांनी पाऊस संपल्यानंतर रात्री 10:00 वाजता मैदानाची पाहणी करून मैदान रात्रीत योग्य करण्याबाबत व मैदान योग्य करण्यासाठी लागणारे साहित्य तात्काळ आणण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व साहित्य पोलीस मुख्यालय येथील भरती मैदानावर येईपर्यंत ते स्वतः थांबून राहिले. सर्व साहित्य मैदानावर आल्यानंतर व मैदान कसे सुके करायचे याबाबतच्या सूचना दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे रात्री 01:00 वाजता निवासस्थानी गेले. पोलीस भरती प्रक्रियेसाठी मैदान पहाटे 04:30 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पूर्ववत तयार केले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित साहेब हे स्वतः पहाटे 04:30 वाजता मैदानावर आले.
त्यांनी पोलीस भरती प्रक्रिया मैदानाची स्वतः पाहणी केल्यानंतर आणखीन सूचना दिल्या व थोड्या वेळातच मैदान पूर्ववत झाल्याची खात्री केली. पोलीस भरती प्रक्रिया ही पहाटे 05:00 वाजल्यापासून सुरू करण्यात आली. पोलीस भरती प्रक्रियेस आलेल्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी, तसेच उंची व छाती याचे मोजमाप करून झाल्यानंतर सकाळी क्रीडा अधिकारी यांना पोलीस भरती मैदानावर बोलावून घेतले. त्यांनी पोलीस भरती मैदान हे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली व सध्या पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत सुनियोजित व पारदर्शक रीतीने चालू आहे.