DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- भारत हा जगातील सर्वात मोठा तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुण पिढी भारताची ताकद व शान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशभरात तसेच महाराष्ट्रात काही गुन्हेगारी घटना तसेच ड्रग्सच्या आणि गांजाच्या प्रकरणांमुळे तरुण पिढी भरकटत असल्याचे दिसून आले आहे. एक चांगल्या संस्कृतीची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ललित पाटील ड्रग्ज, पोर्शे अपघात, पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या तरुणींचे प्रकरण असे हे सर्व प्रकार घडणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.आता याचं लोन आपल्या जयसिंगपूर आणि इचलकरंजीत परिसरात आल्याचं पाहायला मिळतं तरुण पिढी सकाळपासून गांजा उडून फिरत असल्याचं दिसून येते यातून गुन्हेगारी कृती घडते. तीन-चार दिवसांपूर्वीच जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दी मध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून जयसिंगपूर पोलिसांनी चांगली कामगिरी केली . पण शाहू महाराजांनी बसवलेल्या या शहरांमध्ये सर्रासपणे गाजा विक्री होत आहे. महाविद्यालयीन तसेच अल्पवयीन मुले देखील आता ड्रग्जच्या व गाजाच्या विळख्यात सापडल्याचे धक्कायदायक प्रकार मागील काळात समोर आले आहे. गाजा व अंमली पदार्थांच्या सेवनामुळे युवा पिढीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे.याच अनुषंगाने आम्ही जयसिंगपूरकर यांच्या वतीने आज जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख आदरणीय हाके साहेबांनी ज्या पद्धतीने कोथळी उमळवाड मधून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केलेला आहे त्याप्रमाणे जयसिंगपूर हद्दी मधील गांजा विक्रेत्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या आश्वासन आमच्या शिष्टमंडळांना दिलेले आहे.