DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी:- भटक्या विमुक्त जाती जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडियाचे संयोजक संजय मारुती कदम यांनी महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीस तात्काळ जातीचे दाखले द्यावे अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्यामध्ये कंजारभाट. बंजारा .गारुडी. वडार. गोसावी. डमरूवाले .गोंधळीं .वासुदेव गोंधळी व अन्य भटक्या जमातीस पोटजाती यांना विना अटीच्या जातीच्या दाखले मिळाले पाहिजेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भटक्या जाती जमातीचे लोक आपल्या लहान लहान मुला बाळा ना घेऊन आपले हकक व शासनाकडून न्याय मागण्यासाठी सहभाग झाले होते .शासनाकडून जातीच्या दाखल्याची मागणी केली की ६१ वर्षाचा पुरावा मागणीची अट असल्यामुळे आमचे जातीचे दाखले निघत नाही विमुक्त जाती भटक्या जमातींचे देश स्वातंत्र्य पुर्वी पासुन भटकत होतो आणि आजच्या काळात सुध्दा भटकती थांबलेली नाही. यामुळे जन्माच्या व एक ठिकाणांच्या कोठेही नोंदी आढळून येत नाहीत. आमच्याकडे जन्म प्रमाणपत्रच नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि जातीचा दाखलाच नाही तर आरक्षण योजना नोकऱ्या कसे मिळणार यामुळें महाराष्ट्रामध्ये मोठीं लोक संख्या आहे. आणि सांगली जिल्ह्या सर्व तालुका सर्व गावाचा सर्वे केल्यानंतर सांगली जिल्हा या ठिकाणी विमुक्त जाती भटक्या जमाती समाज २ लाख जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत. तरी याचा फटका समाजातील शिक्षणावर पडत असून जसे मागची पिढी मोलमजुरी भटकुन मागून जीवन जगत आहे तसेच आमच्या पुढच्या पिढीलादेखील अशी वेळ येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जो ६१ वर्षाचा मागण्याची अट रद्द करावी जिल्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या जातींना जातीचे प्रमाणपत्र त्वरित द्यावे महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जाचक अटी रद्द करून विना अट राज्य सरकारने त्वरित ठराव पास करून कर्मचाऱ्यांना वाड्या वस्त्यांमध्ये पाठवून विनाअट जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे जिल्हा प्रशासनाने झिरो पेंडसी दाखले करावे व जिल्यातील झिरो पेंडसी दाखल्याचा अहवाल जी. आर. काढावा.असे न झालेस आक्रमक भूमिका घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या विमुक्त जाती भटक्या जमाती च्या गोर गरीब लोकांना त्यांचा हकक व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गागडे युवा फौंडेशन इचलकरंजी व संपुर्ण कंजार भाट समाज सच्चा सैनस्मल बचाव सामाजिक संघटना इचलकरंजी बहुजन सामाजिक संघ इचलकरंजी तसेच सांगली जिल्हा दलीत महासंघ संघटना सांगली यांनी पूर्ण ताकत लावून या लोकांना त्यांच्या हक्काचे जातीचे प्रमाणपत्र मिळवून घेवू यासाठी जाहीर पाठींबा दीला आहे.