DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री:- साक्री शहरातील जानकी नगर भागात वास्तव्यास असलेले दिनेश नथ्थु पाटील (मुख्याध्यापक,आदर्श माध्यमिक विद्यालय, साक्री) यांचे चिरंजीव जयदीप दिनेश पाटील या २४ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार दि.१० जुलै २०२४ बुधवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जयदीप दिनेश पाटील रा.जानकी नगर साक्री ता.साक्री जि. धुळे याने राहत्या घरी त्याच्या बेडरूम मध्ये घराच्या छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत जयदीपचा मृतदेह आढळून आला, त्याला कुटुंबीयांनी प्राथमिक उपचारासाठी अँब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय साक्री येथे दाखल केले असता त्याला डॉ.चांदणेकर यांनी दुपारी ०४:२० वाजता तपासून मयत घोषीत केले या प्रकरणी नातेवाईकांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार साक्री पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मात्र या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.