DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे
अकोला:- नेहरू युवा केंद्र अकोला क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा संचालित नेहरू युवा बहु. क्रिंडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी मुर्तिजापुर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती मूर्तिजापूर व श्री आईबाबा बहू. संस्था सालतवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे स्थानिक भक्तीधाम मंदिर समता नगर येथे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार हरीष भाऊ पिंपळे व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून रीतसर शिबिरास सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रस्ताविक विलास वानखडे यांनी केले . सर्वप्रथम महिला वर्गातील ओम शांती ओम ब्रह्मकुमारीजच्या मुक्ता दीदी व अंकिता खंडारे यांनी प्रथम रक्तदान करून खरी आदरांजली अर्पण केली. 41 वेळा रक्तदान करते समाजसेवक द्वारकाभैय्या दुबे, पोलीस कर्मचारी मंगेश विल्हेकर, अरूण थोरात, होमगार्ड सैनिकांचा प्राण वाचवणारे जिगरबाज होमगार्ड सैनिक अक्षय ठाकरे, संदीप सोनवणे, राजेंद्र कुकलवार, यांच्यासह आदी सर्वांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावले. या शिबिरास आमदार हरिभाऊ पिंपळे, कमलाकर भाऊ गावंडे, कैलास भाऊ महाजन, द्वारका भैया दुबे, सत्यनारायण तिवारी, इब्राहिम भाई घानीवाले, रवि राठी, अशोक थोरात, परिमल कांबळे, सुनील पवार, अरविंद तायडे, सुनील भोजगडीया, पत्रकार प्रवीण ढगे, मधुकरराव इंगोले, महादेव इंगोले, सुधाकरजी गौरखेडे, उमाळे काका, सो .मीना जवादे , शेख रफिक भाई, पत्रकार व गझलकार मिलिंद इंगळे, महादेव पाटील यांनी ही रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, पत्रकार, राजकीय, पोलीस कर्मचारी, होमगार्ड सैनिकांसह, सर्वांनी भेटी देऊन रक्तदान केले, सदर कार्यक्रमास सर्व समाजातील महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शविली. दीपक खंडारे, वैभव वानखडे, दिनेश श्रीवास, रवी माडकर, निलेश वानखडे, अवधूत थोरात, दिगंबर सरदार, विलास सावळे, आकाश वानखडे, रणजीत शिरसाठ, सह सर्वांनी परिश्रम घेतले. लेडी हार्डिंग रक्त संकलन चम्मूचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी अध्यक्ष विलास वानखडे यांनी केले. तर आभार श्री आई बाबा बहुद्देशीय संस्थेचे गजानन चव्हाण यांनी मानले.