स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाईत
2,05,000/- रुपयेचा मुद्येमाल जप्त..
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी — साईनाथ खंडेराय
नांदेड:- नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी जोरात कारवाईचा धडाका चालू आहे. मा. अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी पाहिजे, फरारी व माला विषयी गुन्हे करणारे तसेच अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीतांचा शोध घेवुन (Operation Flush Out) अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन गुंडे, पोकों/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दारारे, असे पोलीस उप विभाग इतवारा हदीत पाहिजे फरारी मथिल आरोपी शोध घेत असताना यांनी दिनांक 28/08/2024 गंजी दुपारचे सुमारास कोठा ते वजिराबादकडे जाणाऱ्या बाजुला कौठा नांदेड येथे मिळालेल्या गोपनीय माहित्तीवरुन छापा टाकून आरोपी नाम शेख अमेर ऊर्फ AD शेख पाशा वय 27 वर्ष व्यवसाय बेकार रा. फारुख मस्जिद जवळ, फारुखनगर नांदेड यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले एक गावठी पिस्टल व सोन्याचे दागिने किमती 2,05,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 784/2024 कलम 3/25, 7/25 शस्त्र अधिनियम कायदयाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात
आला असुन पुढील तपास पोउपनि महेश गायकवाड करीत आहेत. सदर आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता मागिल तीन ते चार महिन्यापुर्वी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामणि हद्यीत गोपालचावडी नांदेड येथे चोरी केले असल्याची सांगितले आहे. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण अभिलेखावर माहिती घेतली असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुरन 398/2024 कलम 457,380 भादवि, कायदया प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे मिळुन आले. सदर आरोपी हा पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण, शिवजी नगर, विमानतळ येथे पाहिजे फरारी मध्ये असल्याचे समजले आहे.
सदरची कामगीरी मा. अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष वेल्लुरोड, श्रीराम दासरे, यांनी पार पाडली असुन वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.