नाशिक (प्रतिनिधी) शांताराम दुनबळे :-
भारतीय पुरस्कार विजेते संघ व भारतीय पत्रकार संघ तसेच स्वराज आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने कला, साहित्य, सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले एकता सन्मान संमेलन 2022 आयोजन नाशिक येथील साई लिला लाॅन्स सभागृहात पार पडले.यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना गौरविण्यात आले.पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असताना सामाजिक परिवर्तनाची प्रतिमा निर्माण करणारे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राहणारे दर्शन पोलीस टाइमचे रायगड जिल्हा क्राइम ब्युरो रिपोर्टर जयेश जाधव यांनी कोवीड- १९ च्या अतिशय बिकट परिस्थितीत आपत्ती काळात केलेले योगदान अतिशय महत्त्वाचे होते विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील दुर्बल व हताश घटकांपर्यंत पोहचवून त्यांना विविध प्रकारचे सहाय्य करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे. याशिवाय राष्ट्रीय एकात्मता हे मुल्य रूजविण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद व प्रशंसनीय आहे त्याच्या कार्याची दखल घेऊन दर्शन पोलीस टाइमचे रायगड जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर जयेश जाधव यांना भारतीय पुरस्कार विजेते संघ व आगरी समाजाचे नेते जयेंद्रदादा खुणे यांच्या हस्ते राष्ट्रीय कृतज्ञता २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाशिक येथील रविंद्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे, भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, नाशिक लोकसभा संसद सदस्य हेमंत गोडसे,अॅड हुसेन सैय्यद,राहुरीचे मा.उपनगराध्यक्ष दिनकर पवार ,स्वराज आंदोलन चे संपादक सुखदेव भालेरावआदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार जयेश जाधव यांना , सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील येथील दर्शन पोलीस टाइमचे प्रतिनिधी जयेश जाधव यांना नाशिक येथे राष्ट्रीय कृतज्ञता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.