DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी :- ह भ प वैकुंठवासी तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर यांच्या कृपाशीर्वादाने दक्षिणमुखी हनुमान मंदिर कार्तिक वारी पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आली. या दिंडीचे पहिलेच वर्ष असल्याने सम्राट अशोक नगर येथील पन्नास ते साठ नागरिक दिंडीमध्ये सहभागी झाले. दिंडीची सुरवात दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करून श्रीफळ वाढवून शुभारंभ सुरू केले.
दिनांक 4 /11 /2024 रोजी सकाळी 09:00 वा. ह भ प सुभाष पाटील टाकवडे, ह भ प एकनाथ मुळे प्रवचन केसरी अब्दुल लाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी निघाली आहे . दिंडी नऊ दिवस चालणार आहे. सर्वप्रथम सोमवार दिनांक 4/ 11/2024 ते शनिवार दिनांक 9/ 11 /2024 अशी सहा दिवस चालत जाणार असून रविवार दिनांक 10/11 /2024 ते मंगळवार दिनांक 12 /11/ 2024 असे पंढरपूर ठिकाणी तीन दिवस ह भ प दिगंबर खोत महाराज यांचे प्रवचन होणार आहे. या संपूर्ण दिंडीचे सदस्य भक्तांची चहापाणी नाश्ता जेवण राहण्याची सोय व्यवस्थित रित्या नियोजनबद्ध केलेली आहे. दिंडीमध्ये विणेकरी ह भ प रामदास सावंत व ह भ प सुरेश सावंत, चोपदार ह भ प चाळाप्पा कांबळे व पांडुरंग माळगे आहे दिंडीसाठी नियोजनबद्ध व्यवस्था केलेले ह भ प राजू इंगळे सर्जेराव जावळे, अनिल लक्ष्मण मदगुडे ,विजय विटेकरी ,शितल माने ,चंद्रकांत पाटील ,सचिन दड्डी ,संदीप बोकेफोडे ,सुरेश मोरे, आनंदा गुरव, ह भ प सुधा सावंत ,ह भ प तुळसा दंडगे, सदाशिव माने, सचिन तासगावे, रोहिणी माळगे यांनी केले आहे.